नांदेड। हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा शिवसेना उपनेते खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड शहरातील पत्रकार, रिक्षा चालक, दुधवाले व भाजी विक्रेते याचा आपघाती विमा प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यात नांदेड शहरातील पत्रकार, रिक्षा चालक, दुधवाले, भाजी विक्रेते यानी लाभ घ्यावा आसे अव्हान आयोजक सहसंपर्कप्रमुख नांदेड गंगाधर बडूरे व उपजिल्हाप्रमुख सचिन किसवे यानी केले आहे.
खासदार हेंमत पाटील यानी साद्या शिवसैनिक या पदापासून आपली राजकीय कारकिर्द सुरू केली पण आज ते शिवसेना उपनेतेया पदापर्यत तर हिंगोली लोकसभा मतदारसंघात विक्रमी मतदान घेऊन विजयी घोडदौड केली. त्याच्या वाढदिवसा निमित्ताने नांदेड शहरातील सर्व पत्रकार बांधवांचा. प्रवाशी रिक्षा (अँटो)चालकांचा.नांदेड शहरात कुठल्याही परिस्थितीत घरपोच दुध सेवा देणारे दुधवाले. रस्त्यावर कुंठेही बसुन भाजी विक्री करणाऱ्या व्यक्तीचा म्हणजे 500 व्यक्तीचा अपघाती विमा मोफत वाटप करुन वाढदिवसास साजरा करणार आसल्याचे प्रतिपादन आयोजक सहसंपर्कप्रमुख गंगाधर बडूरे व उपजिल्हाप्रमुख सचिन किसवे यानी केले आहे.
हा कार्यक्रम दि.16-12-2022 रोज शुक्रवार सकाळी 11 वाजता शासकीय विश्रांमगृह नांदेड येथे आयोजित केला आहे या कार्यक्रमासाठी उद्दघाटक म्हणून शिवसेना उपनेते तथा संपर्कप्रमुख आंनदराव जाधव तर प्रमुख मान्यवर म्हणून आमदार बालाजीराव कल्याणकर व शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंढे, आंनदराव बोढारकर, संहसपर्क प्रमुख आकाश रेड्डी आदी मान्यवर उपस्थित राहाणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजक गंगाधर बडूरे शिवसेना सहसंपर्कप्रमुख नांदेड व सचिन किसवे शिवसेना उपजिल्हाप्रमुख उत्तर नांदेड यानी केले आहे.