श्रीनिकेतन प्राथमिक शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन -NNL


नांदेड|
दीपकनगर तरोडा बुद्रुक येथील श्रीनिकेतन प्राथमिक शाळेत  मुख्याध्यापिका डॉ.सौ.एस.एन. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली महामानव, भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमात सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्प पूजन करून अभिवादन करण्यात आले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानमुळेच आज संपूर्ण देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे सामाजिक न्यायाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन उच्चशिक्षित व्हावे असे झाल्यास ‌खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली ठरेल असे प्रतिपादन अध्यक्षीय समारोप करतांना डॉ.सौ.राऊत करून भावपूर्ण अभिवादन केले. यावेळी विद्यार्थी यश पोहरे, गणेश पंजरकर, अभय शर्मा, कु. स्नेहल पोतरे, अनुष्का पोतरे, दिव्या पाईकराव, जान्हवी कांबळे, दिशा पाईकराव यांच्यासह शिक्षकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, ‌विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थि होते.

नरसिंह विद्या मंदिर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन 


नांदेड शहरातील महावीर सोसायटी येथील नरसिंह विद्या मंदिर माध्यमिक शाळेत  मुख्याध्यापक ए.बी.सुर्यवंशी  यांच्या अध्यक्षतेखाली महामानव, भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमात सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्प पूजन करून अभिवादन करण्यात आले.

ए.बी.सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात पर्यवेक्षक ओ.एस. कल्याणकर , व्ही. एस.पाटील , सौ.के.एल.कर्नेवार, यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटील व्हि.एस.यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकले व  तसेच  यावेळी विद्यार्थी शंन्तनू गोडबोले,स्वाती हानमंते ,प्रणवी नरवाडे, प्रेरणा हटकर ,सॄष्टी भालेराव, प्रेरणा हाटकर, गौरव खंदारे, आराध्या गायकवाड या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.  व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक पी.पी. आयनेले  यांनी तर उपस्थित त्यांचे आभार सौ.के.एल.कर्नेवार यांनी मांनल्या. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, ‌विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थि होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी