नांदेड| महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देगाव चाळ येथील प्रज्ञा करुणा विहार यांच्या वतीने पणती ज्योत अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या सत्रात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून सर्वांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. तर सायंकाळी देगाव चाळ प्रज्ञा करुणा विहार परिसरातील बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका यांच्या उत्स्फूर्त सहभागाने पणती ज्योत रॅली काढून महामानवास अभिवादन करण्यात आले.
यावेळी रमामाता महिला मंडळाच्या गयाबाई हाटकर, गिरजाबाई नवघडे, भिमाबाई हाटकर, निर्मलाबाई पंडित, शिल्पा लोखंडे, गोदावरी बाई राजभोज, सविताबाई नांदेडकर, लक्ष्मीबाई गोडबोले, धुरपताबाई गजभारे, सुमनबाई वाघमारे, भागीरथाबाई थोरात, वनमलाबाई थोरात, आम्रपालाताई कदम, प्रतिभा गोडबोले स्वाती गोडबोले, माणिकरावजी हिंगोले, विजय पंडित, संघपाल गोडबोले, शुभम शेळके, संकेत नरवाडे, कार्यक्रमाचे संयोजक सुभाष लोखंडे आणि परिसरातील विद्यार्थी महिला पुरुष लहान बालक बालिका मोठ्या संख्येने अभिवादन रॅलीमध्ये उपस्थित होते.