स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला इशारा
हिमायतनगर| स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने दि.०२ नोव्हेबर रोजी निवेदन देऊन हिमायतनगर शहरातील रॉयललगर, मुजीबनगर, गणेशवाडी येथील रहिवाश्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी केली होती. मात्र महावितरण कंपनीने अद्याप येथील रहिवाश्यांच्या विजेची समस्या सोडवली नसल्यामुळे आपल्या कार्यालायसमोर आमरण उपोषणाला वसत असल्याचे निवेदन दिले आहे. त्यामुळे हिमायतनगर येथील महावितरण कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे.
हिमायतनगर शहरातील रॉयललगर, मुजीबनगर ,गणेशवाडी येथी, नागरिकांना विज पुरवठा केला जातो.मात्र गेल्या काही महिन्यापासून विजेचा कमी दाबाने पुरवठा होतो आहे. त्यामुळे आम्हा रहिवाशी नागरिकांना आपल्या महावितरण कडून दिली जाणारी वीज व्होलटेज कमी पडतो. आणि थ्री फेज लाईट नसल्याने आमास अनेक समस्यांना तोंड यावं लागत आहे. यासाठी नागरिकांनी वारंवार आपल्या महावितरण कार्यालयाकडे तक्रार करून देखील समस्या सोडविण्यात आली नाही. त्यामुळे दि. 14/12/2022 रोजी 11.00 वाजता लोकशाहीच्या मार्गाने आमरण उपोषणास बसत आहे. यामुळे होणाऱ्या परिणामाची पूर्ण जबाबदारी हि महावितरण कपनी ली. वर राहील. असेही स्वाभिमानी समभाजी ब्रिगेडच्या बालाजी लक्ष्मण ढोणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
या भागातील नागरिकांच्या वीज समस्या सोडविण्यासाठी उपोषणात ठेवण्यात येणाऱ्या मागण्या पुढील प्रमाणे नवीन डी. पि. बसवून देणे अथवा जि डी. पी. आहे ती वाडवून देणे, रॉयल नगर, गणेशवाडी, मुजीबनगर या ठिकाणी थ्री फ़िज लाईट चालू करून यावी, जिथे पोलची आवश्यता आहे त्या ठिकाणी पोल बसवून द्यावे अश्या तीन मागण्या ठेवण्यात आल्या आहेत. या मागण्या सोडविल्या नाहीतर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. या निवेदनाच्या प्रति तहसीलदार आणि पोलीस थानकासही दिल्या आहेत.