नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात तीन दिवसीय हिंदी राष्ट्रीय चर्चासत्र मोठ्या उत्साहात संपन्न -NNL


नांदेड|
केंद्रीय हिंदी निदेशालय, उच्चतर शिक्षा विभाग, शिक्षा मंत्रालय, भारत सरकार व अभिनव भारत शिक्षण संस्था संचलित, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने *हिंदी के प्रचार प्रसार में महाराष्ट्र की भूमिका* या विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन दिनांक 28 ते 30 नोव्हेंबर 2022 दरम्यान यशस्वीरित्या संपन्न झाले.

या राष्ट्रीय चर्चासत्रात देशातील विविध भागातील हिंदी विषयाचे विचारवंत तथा तज्ञ उपस्थित होते. त्यामध्ये हिंदी भाषीक विचारवंत प्रो. डॉ. हरिमोहन बुधोलीया, उज्जैन, डॉ. सुनील तिवारी, दिल्ली, डॉ. किंशुक पाठक, गया, बिहार आणि अ हिंदी भाषीक विचारवंत व तज्ञ प्रो. डाँ. आर. एस. सर्राजू, हैदराबाद, प्रो. डॉ. अर्जुन चव्हाण, कोल्हापूर, डॉ. प्रदीप त्रिपाठी, गंगटोक तसेच स्थानिक हिंदी विचारवंत स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डाँ. शेषराव सुर्यवंशी, डाँ. सु. ग. चव्हाण, नायगाव, डॉ. अशोक जाधव, उमरी, नेहा शर्मा, नांदेड, डाँ. मारुती लुटे, नांदेड, डॉ. आबासाहेब कल्याणकर, नांदेड, डॉ. सुधीर शिवणीकर, नांदेड, डॉ. परविंदरकौर महाजन, नांदेड,  डाँ. दिपक पवार, भोकर, डाँ. सुनील जाधव, नांदेड, डॉ. विजय पवार, पूर्णा, डॉ. जहिरोद्दीन पठाण, ऊमरी, डाँ. लक्ष्मण काळे, नांदेड, डॉ. साईनाथ साहू, नांदेड, डाँ. मुकुंद कवडे, नांदेड, डाँ. रत्नमाला घुले, नांदेड, डाँ. शिवाजी भदरगे, नांदेड अशा हिंदी भाषी व अहिंदी भाषी विद्वानांनी विविध विषयावर आपले विचार मांडले.

या तीन दिवशी राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये ज्या विविध उपविषयांवर विचारमंथन झाले त्यामध्ये महाराष्ट्राची हिंदी पत्रकारितेतील भूमिका, हिंदी भाषेच्या प्रचार व प्रसारामध्ये संतांचे योगदान, हिंदी भाषांतरित साहित्य हे होते. विविध संस्था समित्यांद्वारा हिंदी भाषेचा प्रसार व प्रचार करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका होती असे सर्व विचारवंतांनी प्रतिपादित केले. ह्या तीन दिवसीय चर्चासत्रास अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री बालासाहेब पांडे यांचे मार्गदर्शन लाभले. 

चर्चासत्र यशस्वितेसाठी नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर शिवणीकर, केंद्रीय हिंदी निदेशालयाचे सहाय्यक अनुसंधान अधिकारी, श्री सुनील कुमार, स्थानिक संयोजक डॉ. आबासाहेब कल्याणकर, चर्चासत्राच्या कार्यवाहक डॉ. सौ. परिंदरकौर महाजन, हिंदी विभागातील प्राध्यापक डॉ. श्यामसुंदर माधनुरे, डॉ. बाबू गिरी, प्रा. सौ. मनीषा वाघमारे, प्रा. क्षमा करजगावकर, डॉ. सौ. संध्या ठाकूर, डॉ. गिरीश पांडे, डॉ. भालचंद्र धर्मापुरीकर, सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान होते. याप्रसंगी महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील हिंदी विभागाचे प्रमुख, प्राध्यापक, हिंदी प्रेमी, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वृंद, व विद्यार्थी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी