इतर संबंधित विभागात संचिकेतील कागदपत्रे सुरक्षित
नांदेड। "बचत भवनातील आग घटनेत जळालेल्या संचिकेतील कागदपत्रांच्या सर्वप्रती टाऊन प्लॅनिंग विभागाकडे सुरक्षित आहेत.
शासन स्तरावर अनेक ठिकाणी कागदपत्रांच्या प्रती द्याव्या लागत असल्याने याप्रती इतर संबंधित विभागातून त्या उपलब्ध करून घेत आहोत. बचत भवनात आग लागल्यामुळे त्या कागदपत्राबाबत कोणतीही आशंका बाळगायचे कारण नाही.
आग नेमकी कशी लागली या बाबत चौकशी करण्यात येत असून कोणत्या घातपाताची शक्यता सध्या तरी दिसत नाही. चौकशीअंती यात जो कोणी दोषी आढळेल त्यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करू."- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत