नवीन नांदेड। ५२ महाराष्ट्र बटालियन एनसीसी नांदेड मार्फत घेण्यात आलेल्या वार्षिक प्रशिक्षण शिबीर (२२४) अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमात पोवाडा गायनामध्ये जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी संचलित शिवाजी विद्यालय सिडको, नांदेड एनसीसी ग्रुपला रजत पदक प्राप्त झाले.
सदरील रजत पदक माननीय जिल्हाधिकारी अभिजीत राऊत , कर्नल एम.रंगाराव अडीम ऑफिसर वैत्रीवेल्लू सर,नांदेडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत,संदीप निमसे (ए आर टी ओ) नांदेड, बालाजी जाधव (आरटीओ) इन्स्पेक्टर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
जिल्हा क्रिडा विभागातर्फे १२ डिसेंबर रोजी गुरु गोविंदसिंघजी बॅडमिंटन हॉल, नांदेड येथे घेण्यात आलेल्या १७ वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठीच्या कॅरम स्पर्धेत शिवाजी विद्यालय सिडको शाळेतील गोविंद संदीप ढगे याने यश मिळविले असुन त्याची राज्यस्तरीय कॅरम स्पधेसाठी निवड झाली आहे.
शालेय विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या वरील दुहेरी यशाबद्दल जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी या संस्थेचे उपाध्यक्ष तथा शाळेचे उपमुख्याध्यापक रवि शिवाजीराव जाधव यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मुख्याद्यापक प्रा.व्ही.के. हंगरगेकर, पर्यवेक्षक एन.एम. भारसावडे, एस.आर.बिरगे, व्ही.एस. वाघमारे, प्रा.एस.एम.देवरे, ए.डी.मोरे, सहाय्यक एन.सी.सी अधिकारी एस.आर. भोसीकर, एस.डी. शिंदे व यशवंत शालेय विद्यार्थी उपस्थित होते.