अर्धापूर| श्रीसंत संताजी जगनाडे महाराज यांनी केलेले कार्य प्रेरणादायी उर्जा निर्माण करणारे असून त्यांचे विचार घरा घरात पोहचावे असे आवाहन जेष्ठ पत्रकार निळकंठराव मदने यांनी जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतानां दि.८ गुरुवारी रोजी व्यक्त केले आहे.
युवाच्या वतीने श्रीसंत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार सखाराम क्षीरसागर,प्रमुख वक्ते जिल्हा सचिव निळकंठराव मदने प्रा.संतोष लंगडे,शहराध्यक्ष संदीप राऊत,उपतालुका प्रमुख अशोक डांगे, ओमप्रकाश पत्रे,ग्रा.प.सदस्य रुपेश देशमुख,शंकर हापगुंडे, रमेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्रीसंत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पुजन करून हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधीत करतांना जिल्हा सचिव निळकंठराव मदने म्हणाले की, संत श्री तुकाराम महाराज यांची गाथा श्रीसंत संताजी जगनाडे महाराज यांच्या स्मरणशक्तिच्या ताकदीमुळे लिहून ठेवल्यामुळे आजच्या पिढीने श्रीसंत संताजी जगनाडे महाराज यांचा आर्दश घेऊन कार्य करावे तरूणांनी भविष्यातील आवाहने लक्षात घेता शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करावे तसेच श्रीसंत संताजी जगनाडे महाराज यांनी दाखवलेल्या मार्गावर चालावे व त्यांचा संपुर्ण इतिहास जगासमोर आणावा असे आवाहन जेष्ठ पत्रकार निळकंठराव मदने यांनी केले.
याप्रसंगी अनेकांनी आपले विचार मांडले.यावेळी संयोजक सटवाआप्पा वाघमारे,विनोद बनसोडे, शहरप्रमुख शेख रफिक,गुरुराज रणखांब,शिवशंकर वाघमारे,शंकर गोमाशे,संतोष वाघमारे, शिवहार गोविंदपूरे, अड गौरव सरोदे, सुरेश पतंगे,भगवान हांडे,शंकर घुकसे,मारोती मुधळे,मंगेश महाजन, राजकुमार मदने, यांच्या सह अनेकांची उपस्थितीती होती.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सखाराम क्षीरसागर यांनी केले तर आभार संदीप राऊत यांनी मानले.