नायगांव, रामप्रसाद चन्नावार। गुजरात निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या विक्रमी विजयाबद्दल शहरातील भाजपाचे युवा नेते गजानन पाटील चव्हाण व भाजपा शहर अध्यक्ष शंकरराव पाटील कल्याण यांच्या नेतृत्वाखाली शहरातील डॉ हेडगेवार चौक सह विविध ठिकाणी एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. हा दणदणीत विजय पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या सशक्त नेतृत्वावर जनतेचा विश्वास आणि प्रेमाचे प्रमाण आहे. पेढे वाटून,फटाके फोडून,नायगांव येथील डाॅ हेडगेवार चौकात जल्लोष करण्यात आला.
गुजरात मध्ये अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणात यश मिळाल्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले सकाळी 10 वाजल्यापासून भाजपच्या पदाधिकाऱ्यांची गजानन शंकरराव पाटील चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयात गर्दी होऊ लागली. दूरचित्रवाणी वर जसजसे निकाल जाहीर होऊ लागले तसे तसे घोषणांचा जोर वाढू लागला.विक्रमी आघाडी घेतल्याचे निश्चित झाल्यानंतर सर्वजण नायगांव येथील हेडगेवार चौकात जमा झाले.देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो,गुजरात तो एक झाकी है मुंबई मनपा बाकी है भारत माता की जय वंदे मातरम यासारख्या घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला.भाजपाचे झेंडे हातात गळ्यामध्ये घेतलेले तरुणांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी उपस्थित भाजपा जिल्हा चिटणीस देविदास पाटील बोमनाळे, नायगांव शहराध्यक्ष शंकर पाटील कल्याण, ज्येष्ठ मार्गदर्शक भाऊराव पाटील चव्हाण, हिंदवी व परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष रणजीत पाटील देशमुख, गगाधर पाटील कल्याण, माधव पाटील कल्याण, राजू अप्पा बेळगे, भाजपा तथा सामाजिक कार्यकर्ते निळकंठ पाटील शिंदे पळसगावकर, सामाजिक भूमिका जोपासणारे कार्यकर्ते शिवानंद भाऊ पांचाळ, प्रसिद्ध शाहीर बळीराम पाटील जाधव सुजलेगावकर, अशोक पाटील पवार, माधव वसंतराव चव्हाण, चंद्रकांत पाटील तमलूरे, विठ्ठल बोरीकर, प्रवीण बिरेवार, किरण पाटील मोरे, प्रमोद भाऊ बिरेवार, संजय गुजरवाड, सह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.