सर्व पक्षीय सहभागातून मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव अधिक लोकाभिमूख करू - खा. प्रताप पा. चिखलीकर -NNL

सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत सर्वसमावेशक समितीचा शासन निर्णय    


नांदेड|
अनेक अर्थाने महत्वपूर्ण असलेला मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव अधिक व्यापक व सर्वसमावेशक व्हावा यासाठी शासनाने सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नियोजनासाठी शासन निर्णयाद्वारे समिती गठीत केल्याची माहिती खासदार तथा या समितीचे अध्यक्ष प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली. हे अमृत महोत्सवी वर्षे लोकशाही मुल्यांच्यादृष्टिने, सांस्कृतिक मुल्यांच्यादृष्टिने अधिक व्यापक व्हावे यासाठी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींसह साहित्य, कला क्षेत्रातील मान्यवरांची समिती आवश्यक होती, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील कला, साहित्य, इतिहास या क्षेत्रात भरीव योगदान देणारे साहित्यिक यांचा समावेश करतांना अधिक आनंद असल्याचे ते म्हणाले. 

या समितीच्या अशासकीय सदस्यपदी माजी पालकमंत्री आमदार अशोकराव चव्हाण, खासदार हेमंत पाटील, खासदार सुधाकरराव श्रृंगारे, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार भिमराव केराम, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार तुषार राठोड, आमदार बालाजीराव कल्याणकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार राजेश पवार, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार जितेश अंतापूरकर, माजी आमदार सुभाषराव साबणे यांची नियुक्ती केली आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. 

याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत तांबोळी, ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉ. प्रभाकर देव, नांदेड मसापचे अध्यक्ष प्रभाकर कानडखेडकर, प्रा. सुरेश सावंत, श्रीमती वृषाली माधवराव किन्हाळकर, प्रा. जगदीश कदम, देविदास फुलारी, यशवंत गादगे, ज्येष्ठ गायक संजय जोशी, श्रीमती आनंदी विकास, रत्नाकर आपस्तंभ, ज्येष्ठ नाट्यकर्मी लक्ष्मण संगेवार, नाथा चिंतळे, प्रा. निवृत्ती कौसल्ये, राजेश कपूर, राम तुप्तेवार, डॉ. सान्वी (भरत) जेठवाणी, शाहीर रमेश गिरी हे अशासकीय सदस्य आहेत. 

ज्येष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी, संपादक विजय सोनवणे, संपादक शंतनू डोईफोडे, पत्रकार विजय जोशी,  चारुदत्त चौधरी, प्रल्हाद उमाटे, व्यंकटराव गोजेगावकर, प्रविण साले, दिलीप कंदकुर्ते, गंगाधरराव जोशी, सुनील नेरलकर, प्रविण पाटील चिखलीकर, मिलिंद देशमुख, डॉ. शाम तेलंग, ॲड दिलीप ठाकूर, सुरेश गायकवाड, दिपकसिंह रावत यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. 

शासकीय सदस्य म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त, उपवनसंरक्षक, अधिक्षक अभियंता, जिल्हा माहिती अधिकारी, संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई हे या समितीचे शासकीय सदस्य म्हणून असतील. मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत आयोजित करावयाच्या कार्यक्रमाचे नियोजन व रुपरेषा याबाबत सदर समिती संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यामार्फत शासनास शिफारस करेल. समितीची ही कार्यकक्षा असून दिनांक 30 सप्टेंबर 2023 किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत ही समिती कार्यरत राहील. 


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी