माहूर, राज ठाकूर। कमी दाबाने विजपुरवठा होत असल्याने स्वतंत्र डीपी बसविण्याची मागणी नगरसेवक विलास भंडारे व साई रेणुका पार्क परिसरातील नागरिकांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता कोठे व न.प. चे मुख्याधिकारी राजकुमार राठोड यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
माहूर शहरातील वार्ड क्र. १ मधील साई रेणुका पार्क ले-आउट मध्ये अत्यंत कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने परिसरातील नागरिकांना विविध उपकरणे वापरण्यास कमी वीजपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या दैनंदिन कामाचा खोळंबा होत आहे. नागरिकांचे खासगी बोअर चालू होत नाहीत. केवळ 100 ते 120 दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने परिसरातील त्यामुळे पाणी उपलब्ध असतांना सुद्धा परिसरातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नागरिकांनी अनेकदा ,महावितरणला सूचना दिल्या परंतु अद्याप कसलाही तोडगा निघाला नाही. त्यामुळे नागरिकांची अत्यल्प दाबाने विद्युत पुरवठयाची समस्या कायम आहे.
साई रेणुका पार्क परिसरातील नागरिकांना योग्य दाबाने विद्युत पुरवठा होण्याकरिता थ्री-फेस विद्युत पुरवठा उपलब्ध करून देण्यात यावा किंवा साई रेणुका पार्क परिसराकरिता स्वतंत्र डीपी बसवून योग्य दाबाने विद्युत पुरवठा देण्यात यावा याकरिता आवश्यक त्या उपाययोजना करून नागरिकांची अत्यंत कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्याची अडचण दूर करण्याची मागणी उपकार्यकारी अभियंता महावितरण माहूर याना सादर केलेल्या निवेदनात केली आहे. निवेदनावर नगरसेवक प्रा. विलास भंडारे, कॉंग्रेस शहर उपाध्यक्ष अनिल माडपेल्लीवार, सुधाकर चेवटे, विनीत देवकुमार पाटील, सचिन शामराव काण्णव, रमेश जाधव टाकळीकर, संदीप शामराव काण्णव, सागर दुधे, योगेश हेलगंड, विजय घाटे,परेश वाहुळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत निवेदनाची प्रत न.प.चे मुख्याधिकारी राजकुमार राठोड यांनाही देण्यात आली.