चिमुकल्यांचा अनोखा उपक्रम बर्थ डे मुख्याध्यापकांचा ! जल्लोष विद्यार्थ्याचा -NNL


नांदेड।
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक प्रभावी उपक्रम राबवत आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन निर्मल यांचा वाढदिवस गुरुवारी विद्यार्थ्यानी साजरा करत भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. यावर्षा पासून  निर्मल यांनी विद्यार्थ्यात शाळा आपली अशी भावना निर्माण व्हावी. ते शाळेत रमावेत ,धाकाने नाही तर इच्छेने त्यांची शाळेत हजेरी रहावी यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे वाढदिवस शाळेत साजरा करण्याचा उपक्रम राबवला याच उपक्रमाच्या कल्पनेतून विद्यार्थ्यानी मुख्याध्यापकांचा  वाढदिवस साजरा करत त्यांना सुखदः धक्का दिला विद्यार्थ्यांच्या या उपक्रमास शिक्षकांचीही साथ लाभली. यावेळी विद्यार्थ्यानी जल्लोष साजरा केला.

    

अनेक शाळांत मुख्याध्यापक, शिक्षक यांचा ना  समन्वय ना आपुलकीचे संबंध केवळ ड्युटी म्हणून शाळांत उपस्थिती व विद्यार्थ्याना अध्यापन असेच चित्र दिसून येते यातून विद्यार्थी गुणवत्तेत बाधा निर्माण होण्याची भीती तर कांही शाळांत मुख्याध्यापक व शिक्षकांत बेबनाव शाळेचा शैक्षणिक आलेख खाली येण्यास कारणीभूत असतो. अशा परिस्थितीत आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालय इतरांसाठी प्रेरणादायी आहे. मुख्याध्यापक नितीन निर्मल यांनी मुख्याध्यापक - शिक्षक ही दरी दूर करत शाळेतील कर्मचार्यांशी मैत्रीचे नाते निर्माण केले प्रत्येकाच्या सुख -दुःखात सहभागी, कर्मचाऱ्यांचे प्रश्न,त्यांचे काम करण्यात तत्पर. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास निवृत्तीनंतर लगेच निवृत्तीवेतन व लाभ मिळावा यासाठी स्वतः प्रयत्नशील यातून शाळेत चांगले वातावरण निर्माण करण्यात ते यशस्वी झाले यातूनच शिक्षकांच्या बळावर अनेक उपक्रम यशस्वी केले.


यासमवेतच सर्व विद्यार्थ्यांशी थेट संबंध  त्यांच्याशी चर्चा  त्यांच्या आवडीचे उपक्रम, सहलीचे आयोजन तसेच सर्व विद्यार्थ्यांचे वाढदिवस शाळेत साजरा करण्याचा उपक्रम यातून त्यांचे विद्यार्थ्यांशी अनोखे नाते निर्माण झाले. बुधवारी शिक्षकांच्या चर्चेतून मुख्याध्यापक निर्मल यांचा वाढदिवस असल्याचे समजताच कांही विद्यार्थ्यांनी निर्मलसरांचा वाढदिवस शाळेत साजरा करावा अशी इच्छा त्यांच्या वर्ग शिक्षकांकडे व्यक्त केली विद्यार्थ्यांच्या इच्छेचा आदर करत शिक्षकांनी सरप्राईज प्लँन करत मुख्याध्यापक निर्मल यांचा  वाढदिवस साजरा करत त्यांना सुखदः धक्का दिला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी