हदगाव, शे चांदपाशा। शासनाने कार्यालयीन कामकाज करिता पाच दिवसांचा आठवडा केला तरी याचा परिणाम फार काही चागला येत नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांना दोन दिवस विश्रांती मिळत आहे. परंतु असे असतानाही हदगाव शहरासह तालुक्यात विविध शासकीयकार्यालयात नागरिकांचीओरड असुन. अशी ञस्त नागरिकाचे म्हणने आहे.
या बाबतीत माहीती घेतली असता कार्यालया पासून जिल्हास्तारावर वास्तव्यास असलेले अनेक कर्मचारी पाच दिवसांचा आठवडा झाल्यापासून प्रशासकीय वेळेतच दुपारीच घराकडे जाण्याची तयारी करतात. अशी माहीती मिळाली शासनाने पाच दिवसांचा आठवडा केल्यानंतर शासकीय कामकाजात सुधारणा झालेली नाही. नागरिकांच्या समस्या आणि तक्रारींचा निपटारा वेळेवर होत नाही. एका ही कार्यालयात शंभर टक्के सेवा हमी कायद्याची अमलबजावणी होताना दिसत नाही कर्मचाऱ्यांवर दफ्तर दिरंगाई कायद्यानुसार कारवाईची अपेक्षा असुन माञ असे हदगाव तालुक्यात कारवाई झाल्याचे एक ही उदाहरण नाही.
संबंधित विभागाचे काही अधिकारी कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ कार्यालयात हजर राहण्यासाठी कडक सुचना संबंधित विभागाच्या प्रमुखांनी दियायला हवे पण बहुतांशी कर्मचारी कार्यालयात उशीरा हजर होतात आणि आल्यानंतर आधी वरिष्ठांच्या कामांना प्राधान्य देतात.यात बहुतांशी सर्वसामान्यांची कामे राहून जातात. ही वस्तुस्थिती आहे.
त्यासाठी पुन्हा चकरा माराव्या लागत असल्याचे हदगाव तालुक्यातील विविध प्रशासकीय कार्यालयातील चित्र आहे. पाच दिवसांचा आठवडा केल्यापासून शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासात वाढ केली आहे. पण याचा फायदा दिसुन येत नसल्याचा दिसुन येत पाच दिवसांचा आठवडा झाल्यापासून अनेक ठिकाणी कार्यालयात कर्मचारी भेटत कार्यालयातील कामे करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने पाच दिवसांचा आठवडा रद्द करून पूर्वीप्रमाणेच शासकीय कार्यालये सहा दिवस सुरु ठेवावी अशी मागणी नागरिकांकडुन होत आहे.