आशा व गटप्रवर्तकांना किमान वेतन देऊन शासकीय सेवेत कायम करावे : कॉ.उज्वला पडलवार
नांदेड। सीटू संलग्न आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या वतीने मागणी दिनाच्या निमित्ताने दिनांक 9 डिसेंबर रोजी महापालिकेसमोर तीव्र निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले.
देशव्यापी हाकेनुसार सीटू सलग्न फेडरेशनने दहा डिसेंबर मागणी दिवस पाळावा व देशभर आंदोलने करून स्थानिक मागण्यासह राज्य व केंद्र स्तरावरील मागण्या करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले आहे. महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने व अतिरिक्त आयुक्त इंजिनीयर गिरीश कदम यांच्यासह इतर कुणीही जबाबदार अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने आंदोलक आक्रमक झाले होते अशांना व गट प्रवर्तकांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन आदा करावे अशा व गटप्रवर्तकांना कर्मचारी दर्जा देऊन शासकीय सेवेत कायम करावे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक निर्देशाप्रमाणे विना मोबदला कोणतेही काम नाही लावू नये. कोणत्या कामाचा किती मोबदला देण्यात आला त्याची पोचपावती देण्यात यावी. अशा व गटप्रवर्तकांच्या रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्यात.मागील थकीत रक्कम आणि कोविड -१९ प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा. सीटू कामगार संघटनेचे सभासद व सफाई कामगार चांदोजी भिवाजी भिसे यांचे कर्तव्यावर असताना निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी व त्यांच्या एका मुलाला महानगरपालिकेच्या शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घ्यावे. आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे.
आशा व गटप्रवर्तकांना किमान वेतन देऊन सेवेत कायम करावे असे मनोगत फेडरेशनच्या अधक्षा कॉ.उज्वला पडलवार यांनी व्यक्त केले. आंदोलनाचे नेतृत्व अध्यक्षा कॉ. उज्वला पडलवार,सरचिटणीस कॉ.गंगाधर गायकवाड,कॉ.जयराज गायकवाड, कॉ.बंटी वाघमारे, कॉ.श्याम सरोदे, कॉ.मारोती केंद्रे,कॉ.नागेश सरोदे आदींनी केले. आंदोलनात अनेक कर्मचारी सामील झाले होते.