उस्माननगर, माणिक भिसे। नांदेड लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी उस्माननगर ता.क़धार येथील शहीद जवान हणमंत मुकुंद काळे यांच्या स्मारक बांधकामासाठी २५/१५ अंतर्गत तिन लक्ष रूपये मंजूरी चे पत्र दिले आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघात विकासाच्या विविध कामांसाठी आणि लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील अनेक भागाच्या विकासासाठी जिल्ह्याचे लोकप्रिय खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुढाकारातून २५- १५ अंतर्गत (नऊ) ९ कोटी २३ लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
याशिवाय लोहा - कंधार विधानसभा मतदारसंघासाठी लातुरचे खा.सुधाकर शृंगारे यांनीही दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. लोहा - कंधार विधानसभा मतदारसंघातील उस्माननगर येथील शहीद जवान हणमंत मुकुंद काळे यांच्या स्मारकाचे बांधकामासाठी तीन लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.शहीद जवान हणमंत मुकुंद काळे स्मारक बांधकामासाठी निधी कमी पडू देणार नाही .,कमी पडल्यास निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी भगवान राठोड ( भाजपा कंधार तालुकाध्यक्ष ) सुरेश मामा बास्टे ,दत्ता पाटील घोरबांड, उपसरपंच सदर बाशीद शेख,रुद्र ( संजय) वारकड , शिवशंकर काळे,अंगुलीकुमार सोनसळे,अदी ग्रा.प.सदस्य , मान्यवरांच्या उपस्थितीत तीन लक्ष रुपयाच्या निधीचे पत्र देण्यात आले.