प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहीजे -आयुक्त डॉ.सुनील लहाने

पुढील धोका रोखण्यासाठी तपासणी आवश्यक -पोलीस अधिक्षक कोकाटे

पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम -संजीव कुलकर्णी


नांदेड|
आरोग्य चांगले तर जीवन सुखी, त्या करीता प्रत्येक व्यक्तीने वर्षातून एक वेळा आरोग्य तपासणी केली पाहिजे. आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहीजे असे प्रतिपादन नांदेड मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांनी केले. तर जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पुढील आरोग्याचा धोका लक्षात घेण्यासाठी वेळीच तपासणी केली पाहिजे असे सांगितले. तर नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाने आरोग्य तपासणी शिबिर हा उपक्रम स्तुत असल्याचे जेष्ठ पत्रकार सुजीव कुलकर्णी यांनी मत व्यक्त केले.

मराठी पत्रकार संघाची शिखर संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त दि.3 डिसेंबर रोजी पत्रकारांसाठी रक्ताच्या चाचणीसह नेत्र चिकित्सा, दंत चिकित्सा व अन्य तपासण्यासाठी आरोग्य शिबिर जंगमवाडी येथे आयोजित केले होते. यावेळी वरील मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी, तर प्रमुख पाहुणे म्हणून मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियाणी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, जेष्ठ पत्रकार विजय जोशी, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश कांबळे, माजी जिल्हाध्यक्ष प्रदिप नागापूरकर यांची व्यासपिठावर प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलतांना मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने म्हणाले की, सर्वच प्रकारच्या तपासण्या पत्रकारांनी केल्या पाहिजे. कामाचा ताण लक्षात घेता पत्रकारांचे आरोग्यावर दुर्लक्ष होते असे होता कामा नये. माझे आरोग्य ठणठणीत होते पण मी तपासण्या मध्यंतरीच्या काळात केल्या नाही. सरळ अ‍ॅन्जोग्राफी मला करावी लागली त्यामुळे मला काही होणार नाही या मानसिकतेत न राहता पत्रकारांनी आरोग्य तपासणी करावी असे त्यांनी सांगितले. तर जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे म्हणाले स्वतःच्या आरोग्या बरोबरच आपल्या परिवारातील सदस्यांची आरोग्य तपासणी केली पाहिजे. स्पर्धेच्या युगात प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक मिडीयामध्ये काम करणार्‍या पत्रकारांचे आरोग्याकडे दुर्लक्ष आहे. असे न करता त्यांनी आरोग्य तपासणी करावी असे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून जेष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी म्हणाले की, कोरोनाच्या काळामध्ये आपल्या सर्वांना बर्‍याच अडचणीचा सामना करावा लागला. पत्रकारांनी या काळात जीव मुठीत घेवून काम केले. जिल्हा मराठी पत्रकार संघाने आरोग्य तपासणी शिबिर घेतले हा स्तुत्य उपक्रम आहे. पुढील काळात पोटाच्या विकारासाठी नाममात्र शुल्कमध्ये आरोग्य शिबिर ठेवावे अशी सूचना त्यांनी केली. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियाणी म्हणाले की, आज परिषदेचा वर्धापन दिन आहे या दिनाचे औचित्य साधून हे आरोग्य शिबिर घेतले. धावपळीमध्ये पत्रकार आरोग्याच्या बाबीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे एक प्रभावी आरोग्य शिबिर घेतले आहे यातून पत्रकारांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी निश्‍चित फायदा होईल असे ते म्हणाले.

यावेळी पत्रकार नरेश दंडवते, रवी संगनवार, लक्ष्मण भवरे, प्रशांत गवळे, राम तरटे, योगेश लाठकर, रविंद्र कुलकर्णी, पुढरीनाथ बोकारे, विश्‍वनाथ देशमुख, गोविंद करवा, प्रदीप लोखंडे, प्रकाश कांबळे, मनपाचे आरोग्य अधिकारी सुरेश बिसेन, राजकुमार कोटलवार, सुनिल पारडे, कृष्णा उमरीकर, नरेश तुप्तेवार, ज्ञानेश्‍वर सुनेगावकर, करणसिंह बैस, नरेंद्र गडप्पा, किशोर वाघदरीकर, शिवाजी शिंदे, किरण कुलकर्णी, सुर्यकुमार यन्नावार, गजानन कानडे यांच्यासह अनेक पत्रकारांची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी