नांदेड। लहुजी शक्ती सेना नांदेड जिल्हा कार्यकारणीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक दिनांक 08/12/2022 वार सोमवार रोजी रुबी मंगल कार्यालय ढवळे कॉर्नर सिडको नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे.
त्या बैठकीत मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराचे विरोधात चर्चा आणि धोरणात्मक निर्णय संघटनेच्या जिल्ह्यात बांधणी संदर्भात चर्चा आणि नियोजन नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी आणि फेरनिवडी समाजाच्या विविध सामाजिक प्रश्नावर विचार विनिमय संघटनात्मक सामाजिक लढा उभारून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी चर्चासत्र होणार आहेत.
या बैठकीला प्रमुख उपस्थिती मा.विष्णूभाऊ कसबे साहेब लहुजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, मा.सचिनभाऊ क्षीरसागर युवक प्रदेशाध्यक्ष लहुजी शक्ती सेना, दिनेशजी खरात पश्चिम महाराष्ट्र लहुजी शक्ती सेना,मा. नागोराव अंबडवार लहुजी शक्ती सेना मराठवाडा युवक अध्यक्ष, रविकांत पवळे,
यांची राहणार आहे या बैठकीचे आयोजन लहुजी शक्ती सेना नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे या बैठकीला नांदेड जिल्ह्यातील सर्व लहूसैनिक समाज बांधव बंधू भगिनी व संघटनेचे सर्वच पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आव्हान मा. प्रदीप भाऊ वाघमारे लहुजी शक्ती सेना जिल्हाध्यक्ष नांदेड मा.संतोष सूर्यवंशी को.क.जिल्हाध्यक्ष नांदेड यांनी केले आहे.