अर्धापुर/मालेगाव। मालेगाव येथील अखंड शिवनाम सप्ताह ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी तथा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायत्ता मदत कक्षाचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.
अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे अखंड शिवनाम सप्ताह मध्ये मंगेश चिवटे यांना समाज भुषण पुरस्काराने गौरविण्यात येनार होते परंतू अपरिहार्य कारनामुळे मंगेश चिवटे उपस्थीत राहु शकले नाहीत परंतू सुभाशिष कामेवार यांच्या भ्रमणध्वनीवरून समाज बांधवांना शिवनाम सप्ताहाच्या शुभेच्छा मंगेश चिवटे यांनी दिल्या व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशांनुसार राज्यातील रूग्नांची सेवा करन्याची हामी व नांदेड जिल्ह्यातील कुठलाही रूग्न असेल तर सुभाशिष कामेवार यांच्या शी संपर्क करन्याचे आवहान मंगेश चिवटे यांनी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन नांदेड महापालीकेचे माजी महापौर तथा नगरसेवक किशोर स्वामी, उमाकांत राजेवार, मंगेश बुट्टे, जितेंद्र राजेवार, संदिप डाकुलगे, राजाभाऊ राजेवार, दसरत महाराज, संभा केशेवार,नागेश देलमडे, अशोक स्वामी, रमाकांत तिमेवार, नितीन चन्नेवार, जळबा बुट्टे, चनाप्पा डिग्रसे, मानीकराव आवर्दे, माधव बुट्टे, हणूमंत खुर्दामोजे,सचिन गुमटे ,रावसाहेब भोजगंडे,साई काणेवार ,नागोराव आवर्दे आदींची उपस्थिती होती.