गावाच्या सर्वागीण विकासासाठी मि कट्टिबद्ध....सौ.आरती अनिल कदम
नांदेड। लिंबगाव ता.नांदेड येथील ग्रामपचायंतच्या सरपंचपदी महिला सौ.आरती अनिल कदम तर उपसरपंच पदी विश्वास कदम याची निवड करण्यात आली.यावेळी नवनिर्वाचित सरपंच सौ. आरती अनिल कदम यानी गावातील महिलाच्या समस्या व सर्वागीण विकासासाठी कट्टिबद्ध आसल्याचे मत प्रतिपादन केले.
जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला आपला देश गणला जातो दिल्ली ते गल्लीपर्यंत राजकारणात पुरूषांच्या खांद्याला खांदा लाऊन सक्षम पणे राजकारणात महिला सुद्धा तेवढयाच शक्तीने काम करताना दिसत आहेत.लिंबगाव हे पद्मश्री स्व,श्यामरावजी कदम याची जन्मभुमी आहे त्यामुळे या गावाला राजकीय,सामाजिक. आर्थिक संस्कृती आहे.
लिंबगाव ता.नांदेड येथील महिलाच्या समस्याना प्रथमतः प्राधान्य देऊन.गावातील आनेक प्रश्न शिक्षण.आरोग्य.विज रस्ता नाल्या व विशेषतः स्वच्छता अभियान प्रत्येक घरात शौचालय ही संकल्पना राहाणार आसल्याचे मत सरपंच सौ आरती अनिल कदम यानी व्यक्त केले आहे.
यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून मंडळअधिकारी श्री शिंदे तर गावातील प्रमुख उपस्थिती गोपाळराव कदम माजी उपसभापती प.स.नांदेड, संजयराव कदम, माजी उपसभापती कृ.उ. बाजार समिती नांदेड,साहेबराव धनगे ,मा. जि.प. सदस्य नांदेड,प्रतापराव कदम,मा. सरपंच लिंबगाव, दिगांबरराव कदम,भिमराव कदम, मा. सपसरपंच, नुरखाँ पठाण,गजानन फेटुरे, मनोहर ठाडाळे,सुनिल भुसावळे,संजय शितले,सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रकाश भुसाळके,व्यंकटी कदम,पांडुरंग कदम,आतुल वानखेडे,सतिश कदम,प्रशांत कदम व धोंडीबा देवराव भालेराव यावेळी उपस्थित होते.
लिंबगाव येथील सरपंच व उपसरपंच यांच्या निवडीची बातमी समजताच शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख भुजंगदादा पाटील, जिल्हाप्रमुख माधव भाऊ पावडे.जेष्ट शिवसैनिक गणेश शिंदे,संतोष पावडे,दिगाबंर सुयंवशी,बाळु सुयंवशी,प्रताप पावडे व सुनिल रामदासी यांनी प्रत्येक्ष भेटुन शुभेच्छा दिल्या.