भोकर शहरात गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहीमेला सुरुवात -NNL


भोकर।
राज्यामध्ये गोवररुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, नांदेड जिल्हा व भोकर आरोग्य विभागाच्या वतीने भोकर शहरात गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. 

पहिली फैरी दि.१५ डिसेंबर ते २५ डिसेंबर व दुसरी फैरी दि.१५ जानेवारी ते २५ जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये ९ महिने ते १२ महिन्यामध्ये गोवर रुबेला लसीचा पहिला डोस, जिवनसत्व अ मात्रा आणि १६ ते २४ महिन्यामध्ये गोवर रुबेला लसीचा दुसरा डोस व जिवनसत्व अ मात्रा देण्यात येणार आहे. तसेच ९ महिने ते ५ वर्षे पर्यंतच्या वंचित बालकांना गोवर रुबेला लस व जिवनसत्व अ ची मात्रा देण्यात येणार आहे.

गोवर रुबेला लसीचा चुकलेला डोस या विशेष लसीकरण मोहिम मध्ये आवश्य घेण्या बाबत व भोकर शहरातील एकही बालक दि.२५ जानेवारी पर्यंत गोवर लसीकरण पासून वंचित राहू नये, याची खबरदारी पालकांनी व समाज बांधवांनी घ्यावी असे आवाहन भोकर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ अशोक मुंडे,डॉ. सारीका जावळीकर, डॉ सागर रेड्डी बालरोग तज्ञ व सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य सहाय्यक यांनी केले आहे. 

पहिल्या फेरी मध्ये भोकर शहरात सात सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. अपेक्षित लाभार्थी पहिला डोस १६, दुसरा डोस २६, जिवनसत्व अ मात्रा १६ लाभार्थी अपेक्षित आहेत. आज पहिल्या दिवशी गांधी चौक भागातील अंगणवाडी येथे सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये गोवर रुबेला लसीची पहिला डोस दोन, दुसरा डोस तीन व जिवनसत्व अ ची मात्रा पाच लाभार्थी यांना देण्यात आली. 

लसीकरण सत्रात काम करणारे कर्मचारी श्रीमती सरस्वती दिवटे, मुक्ता गुट्टे आरोग्य सेविका, पांडुरंग तम्मलवाड, नामदेव कंधारे आरोग्य कर्मचारी, प्रभावती कवटिकवार, लक्ष्मी कौरवार अंगणवाडी सेविका, गोदावरी बोधनकर, रेखा वस्कलवार अंगणवाडी मदतनीस हे काम करत आहेत. या सत्राचे पर्यवेक्षण डॉ अशोक मुंडे, डॉ सागर रेड्डी व सत्यजीत टिप्रेसवार हे करित आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी