विद्यार्थी परीक्षेत वेळेवर पोहचण्यास विलंब झाल्यास किंवा पेपर देऊ न शकल्यास जबाबदार कोण असा आगार प्रमुखांना आंदोलक पालक व विद्यार्थ्यांचा सवाल
नांदेड। दि.15 डिसेंबर रोजी रोज गुरुवारी दुपारी 1 ते 2 यावेळेत सीटू सलग्न असंघटित कामगार संघटनेच्या वतीने नांदेड शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात दुपारी 12:00 वाजता सीटू संघटने मार्फत निदर्शने केली आहेत.
नांदेड ते जैतापूर ही बस वेळेवर येत नसून नादुरुस्त बस गाड्या या मार्गांवर पाठवल्या जात आहेत.या मार्गावर 20 ते 25 गावातील नागरिकांचे येणे जाणे असून विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या येण्यासाठी बस हाच मुख्य पर्याय आहे.
या परिसरातील अनेक मजूर मिळेल ते काम करण्यासाठी नांदेड येथे दररोज येत असतात. मौजे सोमेश्वर येथील बी.ए. प्रथम वर्षात शिक्षण घेणारा विद्यार्थी नागेश सरोदे हा बसने वेळेवर पोहचू शकला नसल्यामुळे एक पेपर देऊ शकला नाही.यास जबाबदार कोण असा संतप्त सवाल आंदोलकांनी आगार प्रमुखांना विचारला.
सदरील आंदोलना मध्ये विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस ठाणे शिवाजी नगर येथील कर्मचारी आणि पोलीस ठाणे वजीराबाद येथील डीएसबी शाखेचे माधव मरिकुंटेलू व बाळाप्रसाद टरके यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
या वेळी सीटू कामगार कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांनी आंदोलक आणि बस स्थानकतील जमलेले प्रवासी यांना संबोधित केले आहे. त्यावेळी कॉ.गायकवाड म्हणाले की सीटू ने एसटी कर्मचारी संपाच्या वेळी अनेक आंदोलनामध्ये सहभागी होऊन आंदोलनात योगदान दिले आहे परंतु भाजपाने त्याचा गैर फायदा घेत एसटी कर्मचाऱ्यांचा वापर करून घेतला व सत्ता काबीज केली हे दुर्दैवच म्हणावे लागेल कारण शासनाने अद्याप कर्मचाऱ्यांना विलीन करून घेतलेले नाही.
या निदर्शने आंदोलनाचे नेतृत्व असंघटित चे कार्याध्यक्ष कॉ. श्याम सरोदे,संघटक कॉ. जयराज गायकवाड,कॉ.मारोती केंद्रे, कॉ. सचिन खंदारे,कॉ.गंगाधर खुणे,कॉ.सचिन सरोदे, कॉ. दतोपंत इंगळे, कॉ. सोनाजी कांबळे,कॉ.अक्षय गायकवाड,नटराज सरोदे, संदीप नवरे, संदेश पवार, अजय ठोके, करण नवरे, मारोती इंगोले, अनिकेत बोकारे ,अवधूत गोभादे,अंनत पिंगळे,शुभम धोंगडे,विष्णू खरबे, आदींनी केले आहे.