उस्माननगर, माणिक भिसे। उस्माननगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद नंदगावे यांचा सहपत्नीक दवाखान्यातील कर्मचाऱ्यांच्या वतीने शाल श्रीफळ, भेटवस्तू देऊन भावपूर्ण निरोप देण्यात आला.
उस्माननगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ नंदगावे हे मागील एक वर्षापासून येथील रुग्णांना योग्य असे मार्गदर्शन व उपचार करून सेवा केली. जनसेवा हीच ईश्वर सेवा समजावून येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करीत होते.येथील सहकारी व कर्मचाऱ्यां सोबत राहून प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच इमेज निर्माण केली.मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. डॉ.प्रमोद नंदगावे यांची डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयांमध्ये एम डी ( पॅथौलाॅजी ) ला नंबर लागला असल्यामुळे पुढील शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल त्यांना उस्माननगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात निरोप समारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी दवाखान्यातील कर्मचाऱ्यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन व भेटवस्तू देऊन सहपत्नीक सत्कार करून निरोप देण्यात आला.
यावेळी दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ.किरण दुलेवाड ,या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.योगेश दुलेवाड यांच्यासह देशपांडे, चक्रधर ,घागरे , कांबळे ,मुस्तापुरे ,इटकापल्ले ,सौ.कल्यणकर , करेवाड ,ढगे , डांगे ,शेलगावे ,छोटूमियाॅ , उत्तमराव सोनसळे ,मृत्यजंय वारकड ,गोणारे , गायकवाड ,पांडागळे ( शिराढोण उपकेंद्र ) घंटेवाड , सोनटक्के ,आरेफा शेख , यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.याप्रसंगी पत्रकार व जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतिगृहाच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष माणिक भिसे,व वसतीगृहाचे कर्मचारी तथा पत्रकार लक्ष्मण कांबळे , सामाजिक कार्यकर्ते नरेश शिंदे यांची उपस्थिती होती.