हदगाव, शे चांदपाशा। हदगाव शहरात नगर परिषदद्वारे आपल्या सोयीच्या ठिकाणी राष्ट्रपुरुषाच्या नावे मलाईदार कामे करायाची माञ हे करित असतांना राष्ट्रपुरुषाच्या नावाची साधी पाटी सुद्धा लावायची नाही. यावरुन राष्ट्रपुरुषाच्या नावाचा वापर केवळ आपल्या फायद्या करिता़च करायचा काय..? असा संतप्त प्रश्न शहरातील नागरिकांत व्यक्त होतांना दिसुन येत आहे.
या बाबतीत असे की हदगाव शहरात न.पा. हद्दीतील राष्ट्पिता म.गाधी चौकात म.गांधीजींच्या नावाची जिथ पाटी आहे तिथे सीसी नालीचे बाधकाम केल्याचे बोर्ड लावण्यात आलेले आहे. सदर कामचा दर्जा पाहता सुमार असुन, यावर 4लाख 74हजार रु खर्च झाल्याचे दर्शविण्यात आलेले बोर्ड राष्ट्रपिता म.गाधीच्या पाटीजवळ लावण्यात आलेले आहे.
सदर राष्ट्रपिता म.गांधीची अनेक वर्षापासून पाटीच तिथे नाही हे आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्यांच्या नावे माञ लाखो रुपयाचे कामे करुन घ्यायची या बाबतीत न.पा. मुख्याधिकारी तरी या बाबतीत दखल घेवून ज्या राष्ट्रपिता म गाधीच्या नावे लाखो रु खर्च करण्यात येतो तिथे किमान त्याच्या नावाची पाटी तरी लावण्याच्या सुचना दयाव्यात अशी अपेक्षा नागरिक करित आहेत.