डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार जाहीर; दि.४ जानेवारीला बौद्ध धम्म परिषदेत पुरस्कार प्राप्त मान्यवरांना सन्मान करण्यात येणार-NNL

अभि.ठमके,बच्चेवार,बियाणी,माळोदे,राऊत, ठाकूर,डाॅ.सुर्यवंशी,पोपूलवार,एडके,ॲड.बंडेवार आदी पुरस्काराचे मानकरी

हिमायतनगर/नांदेड| डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नांदेड च्यावतिने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान असलेल्या मान्यवरांना देण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समता गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले असून अभि.प्रशांत ठमके, बालाजी बच्चेवार,गोवर्धन बियाणी,एस.जी. माळोदे,अविनाश राऊत, बि.एन.ठाकूर, डाॅ.आनंद सुर्यवंशी,उपा.जनाबाई पोपलवार, आर.एच.एडके,ॲड.राणीपद्मावती बंडेवार, श्रीनिवास मुगावे आदी मान्यवर यंदाच्या या पुरस्काराचे मानकरी ठरले असून एक दिवशीय सहाव्या बौद्ध धम्म परिषदेत येत्या दि.४ जानेवारीला या पुरस्कार प्राप्त मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा, बौध्द धम्म परिषदेचे संयोजक त्रिरत्नकुमार मा.भवरे कामारीकर यांनी आज दिली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान,नांदेड च्यावतिने दरवर्षी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान असलेल्या मान्यवरांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता गौरव राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यासाठी निवड समिती प्रमुख सुप्रसिद्ध सिने अभिनेते डॉ.प्रमोद अंबाळकर, डॉ.पि.बी. नामवाड, डाॅ.इरवंत पल्लेवाड, त्रिरत्नकुमार मा.भवरे यांच्या नेतृत्वात कार्यरत असलेल्या समितीने सन २०२२-२३ या वर्षासाठीचे पुरस्कार जाहीर केले आहेत.

भारतीय बौद्ध महासभेचे अभि.प्रशांत ठमके, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार,नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी एस.जी. माळोदे,उप प्रादेशीक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, सहा.वनसंरक्षक बि.एन. ठाकूर, फिनिक्स हाॅस्पिटलचे डाॅ.आनंद सुर्यवंशी, सेवानिवृत्त शिक्षिका उपा.जनाबाई पोपलवार, हिंगोलीचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी आर.एच.एडके,हिमायतनगरचे वनपरिक्षेत्र अधिकारी बि.एस.चव्हाण, सेवानिवृत्त उप अभियंता श्रीराज भवरे,किनवटचे गटशिक्षणाधिकारी अनिल माहामुने, हिमायतनगरचे पोलीस निरीक्षक बि.डी.भुसनूर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पूणेच्या समतादूत ॲड.राणीपद्मावती परमेश्वर बंडेवार,डॉ.राजेंद्र वानखेडे,भोकरचे सहा.पोलीस निरीक्षक अनिल कांबळे, म.रा.ग्रामसेवक युनियनचे जिल्हा कार्याध्यक्ष श्रीनिवास मुगावे,साहित्यिक डाॅ.मारोती वाघमारे आंदेगांवकर या मान्यवरांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२२-२३ जाहीर करण्यात आला आहे.

दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नांदेड च्यावतिने आयोजित एकदिवशीय सहावी बौद्ध धम्म परिषद सोनारी फाटा, ता.हिमायतनगर येथे दि.४ जानेवारी २०२३ रोजी किनवटचे आ.भिमराव केराम, हदगांव- हिमायतनगरचे आ.माधवराव पा. जवळगांवकर, नांदेड उत्तरचे आ.बालाजी कल्याणकर,नांदेड दक्षिणचे आ.मोहन हंबर्डे,मा.आ.नागेश पाटील आष्टीकर,मा.आ.विजय खडसे,नांदेड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा श्रीमती शांताबाई जवळगांवकर,माजी महापौर शीलाताई भवरे, बाबुराव पाटील कदम कोहळीकर आदी धार्मिक, राजकीय- सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रांत कार्यरत असलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे.

यावेळी पुरस्कार प्राप्त मान्यवरांनाही सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक तथा, बौद्ध धम्म परिषदेचे संयोजक त्रिरत्नकुमार मा. भवरे,स्वागताध्यक्ष प्रा.मोहन मोरे,निमंत्रक सुधाकर पाटील सोनारीकर,माजी सभापती जोगेंद्र नरवाडे,कैलास पाटील माने,बालाजी राठोड,आयोजक लक्ष्मणराव मा.भवरे,अनिल मादसवार,डॉ.मनोज राऊत,प्रताप नरवाडे,राहुल लोणे,संघपाल कांबळे,डॉ.सारीपुत्र गोखले,शेख खय्युम,शाहीर नरेंद्र दोराटे,रमेश नारलेवाड, शाहीर सुभाष गुंडेकर,शिवाजी डोखळे,जळबा जळपते,नागनाथ वच्चेवाड,परमेश्वर वानेगांवकर, यशवंत थोरात,किरण वाघमारे,अविनाश कदम आदींनी दिली. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी