उस्माननगर, माणिक भिसे। आजच्या महागाईच्या काळात तुटपुंज्या मानधरावर हे गरीब कर्मचारी 24 तास काम करीत आहेत या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव आपल्या पाठीशी उभा राहून काही दिवसात वेतनश्रेणीचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तथा सामाजिक न्याय विभाग संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून वेतनश्रेणीचा प्रश्न लवकरात लवकर सोडविणार असे प्रतिपादन नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले. दि.१० डिसेंबर रोजी अनुदानित विद्यार्थ्यी वसतिगृह जिल्हा संघटना नांदेड जिल्हा अधिक्षक व अधिक्षेक्तर कर्मांचारी यांचा भव्य मेळावा गुरुनानक विद्यामंदीर शिवनगर नांदेड येथे पार पडला.
यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय ,कर्तव्यदक्ष, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सुशीलकुमार चव्हाण (भाजपा महानगर उपाध्यक्ष )तर प्रमुख पाहूणे म्हणून प्रविण साले ( जिल्हाध्यक्ष भाजपा )यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की ,अनुदानित वसतीगृह कर्मचाऱ्यांचा जिव्हाळ्याचा असलेल्या वेतनश्रेणीचा प्रश्न सामाजिक न्याय विभागाकडील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री श्री एकनाथ शिंदे व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लवकरच वेतनश्रेणी साठी बैठक आयोजित करून आपला जिव्हाळ्याचा प्रश्न प्राधान्यानी सोडविणार असे प्रतिपादन केले. या मेळाव्यास व्यासपीठावर प्रमुख पाहूणे म्हणून प्रल्हाद आवचार (सभापती मुखेड) वसंत चव्हाण (वसंत शिक्षण संस्था प्राचार्य ) श्रध्दाताई चव्हाण ,प्रकाश चव्हाण ,व्यंकटराव मोकले, धम्मानंद कांबळे ( अनुदानित वसतीगृह संचालक अध्यक्ष ),पंढरीनाथ केंद्रे ,पुढलीकराव जाधव,गणेशरावजी वाघमारे, गणपतराव गौलवाड, गंगाधर कावडे, प्रकाश गुजरवार, मनोहर कांबळे,माधव अण्णा साठे (मुखेड भाजपा )मानकरी सर आदि उपस्थित होते.
पुढे बोलताना म्हणाले, आजच्या महागाईच्या काळात तुटपूंज्या मानधनावर हे गरिब कर्मचारी दहाहजार, साडेआठ हजार रुपय, साडेसात हजार रुपयांवर चोविस तास काम करीत आहेत. या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव आपल्या पाठीशी उभा राहून थोड्याच दिवसात वेतन श्रेणीचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री श्री एकनाथरावजी शिंदे व उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक आयोजित करून वेतन श्रेणीचा प्रश्न लवकरात लवकर सोडविणार असे अश्वासन उपस्थित कर्मारी याना दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुदानित विद्यार्थ्यी वसतिगृह अधिक्षक व अधिक्षेक्तर कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतिश गोटमुकले यांनी विस वर्षांपासून शासनासोबत संघर्ष करत असलेला पाडा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुढे वाचला.
यावेळी वसतीगृह संचालक संघटनेचे जिल्ह्यातील पदधिकारी,संचालक, कर्मचारी व परभणी येथील संचालक व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतिश गोटमुकले यांनी केले व सुत्रसंचलन सौ.मयुरी सुदनवार यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर तेलंग यांनी मानले . हा मेळावा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री सतिश गोटमुकले, संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, साहेबराव गुंडेकर, गंगाधर सिध्देवाड, नामदेव गजले, सुभाष ढवळे,सुभाष कांबळे,गणेश ठोके,दिगांबर डोके,वंदना पाटील, अनिता वडजे ,विलास निवळे आदिनी अथक परिश्रम घेतले.