हदगाव, शे.चांदपाशा| तुरीच्या पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पाने पोखरणारी अळी या भागातील पिकावर दिसून आल्याने त्यापासून पिकाचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषि विभाग या बाबतीत मार्गदर्शन होणे अवश्यक आहे.
हदगाव तालुक्यात उत्पादनही मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. कापूस, सोयाबीननंतर तूर पीक शेतकरी घेतात. परंतु सद्यःस्थितीत हे पीकही संकटात सापडलेले दिसते. यंदाच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. काही शेतकरी तर असे आहेत ज्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. मागच्या महिन्यापर्यंत तुरीची स्थिती चांगली होती. परंतु गेल्या काही दिवसांत पिकाला अळ्यां कुरतुडून खात आहेत. यामुळे शेतकरी ञस्त झाला असुन, अळ्यांच्या प्रादुर्भावामुळे तुरीच्या शेंगा झडत आहेत. जे पीक फुलावर आहे. त्याची फुलेही झडत असून, त्याच्यापासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकरी झटत आहेत. शेतकरी फवारणीही करीत आहेत. तीन प्रकारच्या कीडीचा तुरीवर हल्ला दिसत आहे. त्याला अटकाव करण्यासाठी काय करावे असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
वृक्ष लावा अवश्यक.... पक्षी थांबण्यासाठी वृक्ष कितीअवश्यक आहे हे दिसुन आल इतर व्यवस्था पण करावी लागणार आहे त्यामुळे पक्षाना बसण्याची व्यवस्था होईल. पक्षी तुरीच्या झाडावरील किडे आळ्या किडे हे पक्षी फस्त करतात यामुळे वृक्ष शेतात असणे फार अवश्य क असल्याचे दिसुन आलेले आहे. या बाबतीत तुरीचे उत्पादन घेणा-या काही शेतक-याशी या बाबतीत संपर्क साधल असता ते म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने अळ्यांची संख्या वाढलेली दिसते. कारण किड्यांना पोषक वातावरण आहे. दिवसा तापते आणि रात्रीच्या वेळी गारठा राहतो. त्यामुळे किडे, अळ्यांचे पोषण होते. तुरीवरही अशाच अळ्यांचा प्रादुर्भाव दिसतो आहे.