मुखेड। येथील जिप्सी माॅर्निंग ग्रुपच्या वतीने मुखेडचे भूमीपुत्र दिवंगत साहित्यिक डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
जिप्सीचे संस्थापक अध्यक्ष दादाराव आगलावे म्हणाले की, मुखेड सारख्या ग्रामीण भागातून पुढे आलेला स्वयंप्रकाशित प्रतिभावान हरपला. जेष्ठ समीक्षक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी साठोत्तरी कालखंडात कविता, कथा, दीर्घकथा, कादंबरी, ललित गद्य आणि समीक्षा अशा विविध वाङ्मयप्रकारांत दर्जेदार वाङ्मयनिर्मिती करणारे ज्येष्ठ साहित्यिक -समीक्षक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष असे विविध पदे डाॅ. नागनाथ लालूजीराव कोत्तापल्ले सरांनी भूषविले ही मुखेडवाशीयांसाठी भूषणावह बाब आहे.
जिप्सीचे अध्यक्ष प्रा जय जोशी म्हणाले की, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म २९ मार्च १९४८ रोजी मुखेड (जि. नांदेड) या गावी झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण देगलूर येथे झाले. बी.ए. आणि एम.ए. या दोन्ही परीक्षांत मराठवाडा विद्यापीठात ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. ते कुलपतींच्या सुवर्णपदकाने सन्मानित झाले होते. ‘शंकर पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर शोधप्रबंध लिहून त्यांनी १९८० साली पीएच.डी. पदवी संपादन केली.
त्यांचे निधनाने साहित्याच्या चळवळीचा एक कप्पा रीकामा झाला. यावेळी जिप्सी भूषण बलभीम शेंडगे, वैजनाथ दमकोंडवार, बालाजी तलवारे, सुरेश उत्तरवार, उमाकांत डांगे, राजेश भागवतकर, गोविंद जाधव, बालाजी वडजे, पप्पू कोत्तापल्ले, राम सुंकेवार, पापा चव्हाण, सुप्रभातचे अध्यक्ष लक्ष्मण पत्तेवार, लक्ष्मीकांत चौधरी, दिनेश चौधरी, बालाजी पोलावार,चटलावार यांची उपस्थिती होती.