नांदेड| भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन निमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून नांदेड रेल्वे विभागातून दादर (मुंबई) ला जाण्या करिता आदिलाबाद ते दादर हि विशेष गाडी चालविण्यात येणार आहे, ती पुढील प्रमाणे --
1. गाडी क्रमांक 07058 आदिलाबाद ते दादर विशेष गाडी : गाडी संख्या 07058 आदिलाबाद ते दादर हि विशेष गाडी आदिलाबाद येथून दिनांक 05 डिसेंबर-2022 ला सोमवारी सकाळी 07.00 वाजता सुटेल आणि किनवट, हिमायत नगर, भोकर, मुदखेड, नांदेड, पूर्णा, परभणी, मानवत रोड,सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, लासूर, रोटेगाव, नगरसोल, मनमाड, नासिकरोड , इगतपुरी, कल्याण मार्गे दादर येथे मंगळवारी सकाळी 03.30 वाजता पोहोचेल.
2. गाडी क्रमांक 07057 दादर ते आदिलाबाद विशेष गाडी: गाडी संख्या 07057 दादर ते आदिलाबाद हि विशेष गाडी दादर येथून दिनांक 07 डिसेंबर-2022 ला बुधवारी रात्री 00.50 वाजता सुटेल आणि कल्याण, इगतपुरी, नासिक रोड, मनमाड, नगरसोल, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, पूर्णा, नांदेड, मुदखेड, भोकर, हिमायत नगर, किनवट मार्गे आदिलाबाद येथे बुधवारीच सायंकाळी 18.45 वाजता पोहोचेल. या गाडीत 08 जनरल आणि 02 एस.एल.आर. असे 10 डब्बे असतील.