हदगाव येथे वक्तृत्व स्पर्धा संपन्न
हदगाव। जनतेतुन निवडुन आलेल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातुन आरोग्य, शिक्षण, रोजगार, शुद्ध पिण्याचे पाणी, रस्ते, नाल्या असा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. परंतु रस्ते आणि नाल्यांच्यां विकासा पलिकडे राजकारण जात नाही. खासदार हेमंत पाटील यांनी या पुढे जाऊन शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील नेतृत्व कौशल्य गुण विकसीत व्हावे या हेतुने महाविद्यालयीन युवकांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करुन विद्यार्थ्यांना एक मोठे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासोबतच त्यांच्यातील कला गुणांचा विकास होण्याच्या दृष्टीने मदतगार ठरेल असे बाबुराव कदम कोहळीकर यांनी मत व्यक्त केले.
खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली लोकसभा मतदार संघात सहा दिवसीय कयाधू-पैनगंगा महोत्सवा अंतर्गत हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती खासदार चषक भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार (दि.आठ) हदगाव येथील माहेश्वरी भवन येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाराव लांडगे, माजी सभापती बाबुराव पाटील (रुईकर), माजी उपसभापती विवेक देशमुख, दीपाली पाटील, माजी प्राचार्य श्री. टीकोरे, प्राचार्य श्री. ताडेवार, बालप्रसाद मुदडा, सर्कलप्रमुख मारोतराव हरडपकर, सर्कलप्रमुख सुदर्शन पाटील, माजी सरपंच भास्कर पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक बबनराव माळवदे, सर्कलप्रमुख बाबुराव काळे, लक्ष्मण शिंदे, भगवान सोळंके, बंडु पाटील कोकाटे, राजु पाटील चौतमल, मंचक कदम, यांची उपस्थिती होती.
यावेळी गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील बोलताना म्हणाल्या की, वक्तृत्व स्पर्धा घेण्याचे ठरले तेव्हा या वक्तृत्व स्पर्धा ऐकण्यासाठी किती लोक येतील किती विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होतील असा मुद्दा पुढे आला. परंतु एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मला रस्ते नाल्यांच्या विकासा पुढे जाऊन उद्याचा देश घडवणार्या युवा पिढीसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करणे अधिक सयुक्तीक वाटते असे म्हणत खासदार हेमंत पाटील यांनी पुढाकार घेतला आणि हिंगोली लोकसभा मतदार संघातील सहा विधानसा मतदार संघात विद्यार्थ्यांसा वक्तृत्वस्पर्धेचे आयोजन केले.
त्यास विद्यार्थ्यांकडुन मोठा प्रतिसाद मिळतो आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धेची तयारी करण्यासाठी आज वेळ कमी मिळाला असला तरी, भविष्यात होणाऱ्या स्पर्धेचा विचार करुन जो विषय निवडला आहे त्या विषयावर परखडपणे मते मांडुन आपल्यातील नैतृत्व सिद्ध करावे असे त्या म्हणाल्या. तर माजी जिल्हा परिषद सदस्य संभाराव लांगडे बोलताना म्हणाले की, हदगाव मतदार संघात अनेक लोकप्रतिनिधी झाले. परंतु त्यांच्या हातुन म्हणावा तसा शहराचा विकास झाला नाही. त्यामुळे आमच्या परिसरातील मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण असो वा स्पर्धा यासाठी नांदेड, औरंगाबाद, पुणे, मुंबई गाठावे लागते.
परंतु खासदार हेमंत पाटील यांनी विकासभिमुख राजकारणा सोबतच विद्यार्थ्यांमधील कौशल्य गुणांचा विकास व्हावा, मुलांना दुर्मिळ ग्रंथ वाचनास उपलब्ध व्हावेत यासाठी वाचनालय सुरु करण्यासाठी दोन कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे मुलांना वाचनाची गोडी लागेल, मुलांनी केवळ ऐकीव माहितीच्या आदारे न बोलता वाचुन अभ्यास करुन स्पर्धेत सहभागी व्हावे तेव्हाच त्यांच्यातील नैतृत्व गुण विकसीत होईल आज त्यांनी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली आहे.
या स्पर्धेचा विद्यार्थ्यांना भविष्यात निश्चितच लाभ होईल असे ते म्हणाले. या स्पर्धेचे नामदेव दळवी, प्रा. रामभाऊ कोळपे, मनोहर बसवंते यांनी परिक्षण केले. पंकज मोरे यांनी प्रास्ताविक केले, आशिष साडेगावकर यांनी सुत्रसंचालन केले. तर हदगाव जनसंपर्क अधिकारी आकाश डांगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी यशस्वीतेसाठी खासदार हेमंत पाटील यांचे जनसंपर्क अधिकारी गोविंद गोडसेलवार , अमोल बुद्रुक, चंद्रसेन अडागळे आदींची उपस्थिती होती.