हिमायतनगर शहर व तालुक्यात मुरूम रेतीसह इतर गौण खनिज चोरीचे प्रकार वाढले -NNL

खडकी बा.परिसरात महसूल अधिकाऱ्याने दोन वाहने रंगेहात पकडले


हिमायतनगर,अनिल मादसवार।
हिमायतनगर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रेती मुरूमासह इतर गौणखनिजांची चोरी केली जात आहे. या प्रकाराकडे महसुलीचे मंडळ अधिकारी, तलाठी यांचे स्वार्थपोटी दुर्लक्ष होत असल्याने गौणखणीज चोरीचे प्रकार वाढले आहेत. असाच प्रकार खडकी ब.येथे सुरू असताना महसूलचे नायब तहसीलदार तामस्कर यांनी पोलीस बंदोबस्तात कार्यवाही करून दोन वाहने जप्त केली आहेत. वृत्त लिहीपर्यंत कोणतीही दंडात्मक कार्यवाही झाली नव्हती.


तालुक्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन होत असून, रेती, मुरूम रात्री अपरात्री चोरून नेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत. असाच प्रकार हिमायतनगर तालुक्यातील खडकी बाजार येथे गायरान जमिनीतून चालत असल्याचे  दिनांक 7 सप्टेंबर रोजी समोर आला आहे. दुपारी 3.50 ते 4.50 वाजेच्या दरम्यान मुरूम उत्खनन करण्याचा प्रकार चालत असल्याचे निदर्शनास आले यानंतर जागरूक नागरिकांनी यासंबंधी हिमायतनगर तहसील कार्यालय, पोलीस प्रशासनाला दिली. सदरील उत्खनन हे शासकीय गायराना मधून सुरू असल्याचे समजले.


त्यावरून हिमायतनगर तहसील महसूलचे नायब तहसीलदार अनिल तामसकर, व कुलदीपकर हे दोन कर्मचारासह हिमायतनगर पोलीस स्थानकातील खडकी बीटचे पोलीस जमादार कांगणे मॅडम यांनी घटनास्थळी दाखल होऊन संबंधित ठेकेदाराचे दोन टिप्पर विनापरवाना अवैध रीत्या नेत असल्याचं लक्षात आल्यावर जप्त करून तहसील कार्यालयात लावले आहेत . यामुळे गौण खनिजाची चोरी करणाऱ्याचे धाबे दणाणले असून, आत्तापर्यंत रेल्वेच्या गुप्तेदाराने कुठून कुठून कधी त्याची चोरी केली याची चौकशी करावी दंडात्मक कार्यकारी अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांतून केली जात आहे


हिमायतनगर तहसील अंतर्गत येणाऱ्या खडकी बाजारसह विरसणी, टेंभी, सोनारी, कोठा, धानोरा, वारंगटाकळी, मंगरूळ, बोरगडी, हिमायतनगर सह अन्य गावांमधून मोठ्या प्रमाणात मुरूम, रेती, दगड, यांची कोणत्याही प्रकारची रोयल्टी न काढता अवैध पद्धतीने मंडळ अधिकारी व तलाठ्यांना हाताची धरून उत्खनन होत असल्याचे चित्र सध्या तरी तालुक्यात पहावयास मिळत आहे. महसूल प्रशासनातील तलाठी मंडळ अधिकारी यांच्यावर उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांची वचक नसल्याचे सध्या मोठ्या प्रमाणे दोन खनिजाची चोरी करून शासनाला जुना लावला जात आहे. 

मागील दोन वर्षात आतापर्यंत अवैध उत्खनन करणाऱ्या माफियावर म्हणावी तशी मोठी दंडात्मक कारवाई झालेली नसल्याचे सामान्य नागरिकांतून बोलले जात आहे. त्यामुळे महसूल मधील अधिकारी कर्मचारी यांची गौण खनिज चोरी करणाऱ्या माफियांसोबत मिली भगत आहे का..? असा प्रश्नही पुढे येऊ लागला आहे. या प्रकाराकडे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लक्ष देऊन हिमायतनगर तालुक्यात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज चोरीच्या प्रकाराकडे लक्ष देऊन तालुक्यातील होत असलेल्या रेती, मुरूम, दगडाच्या चोरी प्रकरणी कार्यवाही करून गौण खनिज माफीयाच्या मुसक्या अवळाव्यात अशी मागणी होत आहे.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी