श्री दत्तात्रय उत्सव यात्रेस 7 डिसेम्बर पासून यात्रेस प्रारंभ : श्री महंत 1008 रामभरती महाराज -NNL

कुस्त्यांची दंगल व कृषी प्रदर्शन


नांदेड,आनंदा बोकारे।
तालुक्यातील पवित्रपावन धार्मिकस्थळ गोदावरी तीर्थक्षेत्र संस्थान मोहणपूर मौ. वाहेगाव येथील सुप्रसिद्ध तीन दिवसीय "श्री दत्तात्रय उत्सव यात्रेस बुधवार रोजी श्रद्धाभावाने सुरुवात झाली. श्री दत्तात्रय जयंती निमित्त दरवर्षी उत्सवाचे आयोजन केले जाते. परम संत मोहणीराज महाराज यांचे स्मरण करून विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाले. महंत 1008 रामभरती गुरु मारोती भारती यांच्या मार्गदर्शनात सर्व धार्मिक विधींचे संचालन करण्यात आले. यावेळी महंत 1008 श्री जीवनदास महाराज, महंत कैलाशदास चरणदास वैष्णव व साधू संतांची उपस्थिती होती. 


महंत रामभरती महाराज यांनी माहिती सांगितली की, संत, महात्मा, धार्मिक मंडळी, सर्व भक्तांच्या व गावातील मंडळीच्या सहकार्याने 7 डिसेम्बर रोजी पहाटे श्री दत्तात्रय उत्सवास सुरुवात झाली. कथा वाचन व समाप्ती, पूजा, अभिषेक, आरती, प्रसाद, काकडा, बालक्रीडा ग्रंथाचे परायण, कथा, महाप्रसाद व महापुजा सारखे कार्यक्रम पार पाडण्यात आले. तसेच महाप्रसाद भंडारा कार्यक्रम दिवसभर सुरु होते. आज सकाळी मंदिर बाह्य परिसरात तीन दिवसीय यात्रा (जत्रा) आयोजन करण्यात आले. जात्रेमध्ये आकाशपालणे, झोंके,  मुलांची खेळणी, हॉटेल आणि दुकानें थाटन्यात आले. जिल्हा परिषद आणि तहसील कार्यालयाच्या वतीने कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. 


आज विविध कार्यक्रमांच्या संचालनासाठी श्री गणेश महाजन नांदेड, गंगाधर पाटिल शिंगनगावकर, गणेश मुक्कावार (बीडीओ), आनंद पाटिल, सौ. संगीता विट्ठलराव डक, बाबूराव बोकारे सरपंच सोमेश्वर, शंकर बाबूराव सोनटक्के सरपंच वाहेगाव, राहुल मोहनराव हंबर्डे, एडवोकेट रामगंगाराम कानोरे, दिनेश सेठ, कृषी अधिकारी देशमुख मैडम व सेवक यांनी सहकार्य केले. 


श्री गुरु गोबिंदसिंघजी ब्लड बैंक तर्फे दत्तात्रय जयंती निम्मित रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दत्तात्रय उत्सव यात्रेत मोठे पोलीस बंदोबस्त लावण्यात आले होते. यात्रा सतत तीन दिवस चालणार आहे. दि. 9 रोजी जंगी कुस्त्यांची दंगल ठेवण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी हजारोंच्या संख्येत भाविकांनी दर्शन घेऊन यात्रेचा आनंद आत्मसात केला. 



Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी