दत्त जयंतीदिनी श्री शामसुंदरगिरी गुरु भगवानगिरी महाराज यांचे आगमन -NNL

सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण डांगे यांनी सपत्नीक केली महापूजा 

हिमायतनगर| दत्त संस्थान, आष्ठी ता हदगाव येथील श्री पंचदशनाम जुना आखाडा संतचरण सेवक कीर्तनाचार्य बालयोगी श्री शामसुंदरगिरी गुरु भगवानगिरी महाराज यांचे हिमायतनगर येथील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण डांगे यांच्या निवासस्थानी दि 07 बुधवारी आगमन झाले होते. यावेळी परिसरातील नागरिक व डांगे कुटुंबीयांनी त्यांचा स्वागत केलं. 

श्री दत्त जयंतीचे औचित्य साधून बालयोगी श्री शामसुंदरगिरी गुरु भगवानगिरी महाराज यांचे उपस्थितीत महापूजा करण्यात आली, त्यानंतर रात्रभर दत्त नामाचा जप करण्यात आला.  दत्त जयंतीच्या दिवशी महाराजांचे आगमन झाल्यामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी महाराजांचे मोठ्या आनंदाने पुष्पवृष्टी व चरण स्पर्शाने स्वागत करून लक्ष्मण डांगे यांनी महाराजांची पूजा करून आशीर्वाद घेतले. या शुभप्रसंगी परिसरातील शेकडो महिला पुरुष भाविक भक्तांनी उपस्थित होऊन महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी