नांदेड/मुदखेड। मध्यरात्री बारा वाजताचे सुमारास धक्के जानवल्याची नोंद नॅशनल सेंटर फॉर सिसमोलॉजी च्या वेब साईटवर झाली आहे.
3.0 रिष्टर स्केल ची नोंद झाली आहे यात बारड, नागेली, तिरकसवाडी, शेंबोली व पांडरवाडीचा परिसर आहे. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात रात्री बारा वाजताचे दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले यात कोणतीच जीवित अथवा वित्तहानी झाली नाही.
नॅशनल सेंटर फॉर सिसमोलॉजीच्या वेबसाईटवर भूकंपाची तीव्रता 3.0 रिष्टर स्केल झाली आहे यात बारड, नागेली, तिरकस वाडी, शेंबोली, पांडरवाडी या गावांचा परिसर भुकंपा चे केंद्र स्थान असल्याची महिती तहसिलदार सुजीत नरहरे यांनी दिली आहे.