उस्माननगरच्या मदरसा दारूलूमच्या वतीने इज्तेमाला आलेल्या साथीना खिचडीचे वाटप -NNL


उस्माननगर, माणिक भिसे।
लोहा येथे नुकताच उत्साहात पार पडलेल्या इज्तेमा कार्यक्रमास आलेल्या साथीला (मुस्लिम बांधवांना ) उस्माननगर येथील मदरसा दारूलूम व सामाजिक कार्यकर्ते आमिनशा फकीर , अशोक काळम पाटील,जावेद मौलाना,मुखीद मौलाना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय महामार्गावरील चौकात "साथी आवो खिचडी खावो "म्हणत खिचडीचे वाटप करण्यात आले.

उस्माननगर येथील मदरसा दारूलूम व सामाजिक कार्यकर्ते आमिनशा फकीर,अशोक काळम पाटील, मुखीद मौलाना,जावेद मौलाना, यांनी मागील दोन- तीन वर्षांत संपूर्ण देशात कोरोना या महामारी आजाराने ग्रस्त सर्वसामान्य नागरिकांना केले होते.बाहेर फिरणे बंद केले होते.त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ येवू नये म्हणून येथील मदरसा दारलूम व कार्यकर्ते यांच्या वतीने किटचे वाटप करण्यात आले होते.नेहमी सामाजिक व विधायक कार्यक्रमात सहभागी होत असतात.


नुकत्याच लोहा येथे ६ ते ७ डिसेंबर दरम्यान इज्तेमा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमास नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नांदेड - किवळा उस्माननगर बिदर या राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या (मुस्लिम बांधवांना ) साथीना थांबवून "आवो साथी खावो खिचडी साथी" म्हणत उस्माननगर येथील चौकात खिचडीचे आयोजन करण्यात आले होते.खिचडी वाटप करण्यासाठी सरपंच प्रतिनिधी दत्ता पाटील घोरबांड,मनसुर मौलाना, परमेश्वर पोटजळे , संजय भिसे, सद्दाम पिंजारी, ओमकार मोरे, करीम पठाण ,सादीक शेख शिराढोणकर, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व मित्रांनी  परिश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी