उस्माननगर, माणिक भिसे। शिका , संघटित व्हा, संघर्ष करा,असा महामंत्र देणारे, सर्वांना शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही ,अशी गर्जना करणारे भारतीय संविधान घटनेचे शिल्पकार पं.पू.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनी उस्माननगरसह परिसरातील ठिक ठिकाणी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन आदरांजली वाहण्यात आली.
ग्रामपंचायत कार्यालय येथे सकाळी भारतीय संविधान घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन आदरांजली वाहण्यात आली.यावेळी सरपंच श्रीमती गयाबाई घोरबांड,पोलीस पाटील विश्वाबंर मोरे, अशोक काळम पाटील,आमिनशा फकीर,मा.उपसरपंच तथा मुख्याध्यापक राहुल सोनसळे,दत्ता पाटील घोरबांड,अंगुलीकुमार सोनसळे,संजय ( रुद्र)वारकड , शिवशंकर काळे, गंगाधर भिसे, यांच्यासह पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे, उपाध्यक्ष माणिक भिसे, लक्ष्मण कांबळे, संजय भिसे, परमेश्र्वर पोटजळे, सद्दाम पिंजारी, ओमकार मोरे, यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य नागरिक उपस्थित होते.
उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सभागृहात युगांतर, बोधीसत्व, डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी शिराढोण सर्कलचे माजी जि.प.सदस्य प्रतिनिधी माधवराव भिसे यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी गणेश लोखंडे, माणिक भिसे पठाण अमजदखान, लक्ष्मण कांबळे,आमिनशा फकीर, अशोक काळम पाटील, शिवशंकर काळे,दत्ता पाटील घोरबांड,सजय वारकड , गंगाधर भिसे,यांची उपस्थिती होती.यावेळी अनेकांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर प्रकाश टाकणारी भाषणे झाली.
सम्राट अशोक प्राथमिक शाळा येथे मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांच्या व सहशिक्षक उपस्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन आदरांजली वाहण्यात आली.यावेळी मुख्याध्यापक राहुल सोनसळे,मन्मथ केसे, देविदास डांगे, भगवान राक्षसमारे, शकील शेख,समताबाई , यांच्यासह शिक्षिका कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी विद्यार्थी व शिक्षक यांनी समयोचित भाषणी झाली.जि.प.के.प्रा. शाळा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख जयवंतराव काळे यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.यावेळी एकनाथ केंद्रे,शेख,पठाण , सहशिक्षिका यांची उपस्थिती होती.अनेकांनी यावेळी भाषणे करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्याचें आवाहन मुख्याध्यापक जयवंतराव काळे यांनी केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मुख्याध्यापिका सौ.विद्या वांगे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.यावेळी शाळेतील गौतम सोनकांबळे,पांडागळे , अनिरूद्ध सिरसाळकर, सौ.मंजुषा( देशमुख ) सिरसाळकर प्रल्हाद सुर्यवंशी, रामेश्वर पांडागळे,सौ.मिनाक्षी लोलगे ,सौ.प्रेमला गाजुलवाड यांच्या सह शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी कर्मचारी उपस्थित होते.यावेळी भाषणे झाली..