नांदेड| दक्षिण मध्य रेल्वे ने प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून नांदेड-यशवंतपूर-नांदेड दरम्यान विशेष गाडीच्या चार फेऱ्या करण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे –
1. गाडी क्रमांक 07093 नांदेड- यशवंतपूर विशेष गाडी (सोमवार) : हि गाडी हुजूर साहिब नांदेड येथून दिनांक 05, 12, 19 आणि 26 डिसेंबर, 2023 रोजी दर सोमवारी दुपारी 13.05 वाजता सुटेल आणि पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, होम्नाबाद, ताजसुलतानपूर, कालबुरगी, वाडी, रायचूर, मंत्रालयम रोड, अदोनी, गुंटकळ, अनंतपुर, धर्मावरम, हिंदुर, यल्हंका या रेल्वे स्थानकांवर थांबून आणि यशवंतपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 11.00 वाजता पोहोचेल.
2. गाडी क्रमांक 07094 यशवंतपूर – नांदेड विशेष गाडी : हि गाडी यशवंतपूर येथून दिनांक 6, 13, 20 आणि 27 डिसेंबर, 2022 रोजी दर मंगळवारी दुपारी 16.15 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच हुजूर साहिब नांदेड येथे बुधवारी दुपारी 13.00 वाजता पोहोचेल.