मालेगाव| नांदेड येथे झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी कै. मुंजाजी पाटील उच्च माध्यमिक विद्यालय मालेगाव येथील सात स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यापैकी पाच विद्यार्थ्यांची तनुजा कदम, दुर्गा मुरमुरे, निकिता गंगेवार, मारोती मरकुंदे, प्रथमेश शिंदे... या विद्यार्थ्यांची निवड ही विभाग स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी झाली आहे.
त्यांचे संस्थेचे सचिव संजय पाटील मालेगावकर, श्री जितेन्द्र राजेवार सर , मल्लिकार्जुन मरकुंदे यांनी भेटवस्तू देऊन सत्कार केला... क्रीडा शिक्षक श्री हटकर सर यांचा देखील सत्कार करण्यात आला. तसेच कॉलेजचे प्राचार्य श्रीहरी खुर्दामोजे , उप प्राचार्य अनुराधा कदम, प्रा.राजेसाब शेख सर, प्रा.तानाजी मेटकर सर, प्रा. विजयमाला ढोले मॅडम , प्रा.सुदर्शन फाजगे सर, प्रा. विशाल वाघमारे सर, वाघमारे वैजनाथ सर, शिवराज जाधव सर, रविंद्रसिंह मदनसिंह (ठाकूर सर ), नितीन तोटेवाड सर, श्याम सावंत सर, ज्योती कदम मॅडम , उमेश उबाळे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.