खेळाडूंच्या जीवनातील खरे चढउतार समोर यावेत :डॉ लक्ष्मीकांत देशमुख -NNL

'डान्सिंग ऑन द व्हॉल्ट ऑफ डेथ' चे प्रकाशन 


पुणे|
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.लक्ष्मीकांत देशमुख लिखित 'डान्सिंग ऑन द व्हॉल्ट ऑफ डेथ' या पुस्तकाचे  प्रकाशन आज 'पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हल' मध्ये झाले.लता ग्वालानी,डॉ विलास साळुंखे यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले.हा कार्यक्रम २ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता यशदा संस्थेत झाला.प्रसिद्ध खेळाडूंच्या आयुष्यात आलेल्या गंभीर दुखापतींपासून त्यांच्या आयुष्यातील चढउतारांचा मागोवा या पुस्तकात घेण्यात आला आहे. खेळाडू हे उत्सवमूर्ती, सेलिब्रिटी असले तरी आपल्यासारखेच माणूस असल्याने त्यांच्यातील भावभावनांचे चढ उतार, आव्हाने, समस्या यांचे  वर्णन पुस्तकात शब्दबद्ध केले आहे.

डान्सिंग ऑन द व्हॉल्ट ऑफ डेथ' या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर प्रा. विलास साळुंखे यांनी लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांची छोटेखानी मुलाखत घेतली. स्पोर्ट फिल्म आणि स्पोर्ट फिक्शन या विषयी मत मांडताना डॉ.देशमुख  म्हणाले,' चित्रपटांमध्ये खेळाडूंचं चित्रण हे अधिकाधिक ग्लॅमरस करण्याकडे निर्माते आणि दिग्दर्शकांचा कल असतो. त्या खेळाडूच्या जीवनातील खरे चढ उतार, यश अपयश हे सखोलपणे, त्या प्रमाणात मांडले जात नाही, मात्र खेळाडूंच्या जीवनावर पुस्तक लिहिताना त्याचा पूर्ण जीवनपट मांडण्याची संधी लेखकापुढे असते, त्यामुळे चित्रपटांपेक्षा पुस्तकांतून कोणत्याही खेळाडूचे जीवन चरित्र हे अधिकाधिक प्रकर्षाने वाचकांना भिडते, भिडू शकते'. 

'सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर,गुंडाप्पा विश्वनाथ,विनोद कांबळी,दीपा कर्माकर,दूती चंद,नंदा जाधव,शांती सुंदरराजन,डेव्हिड ग्राफ यांच्या जीवनावरील आणि परस्पर संबंधांचाही या पुस्तकात परामर्श घेतला असून या  तसेच यांसारख्या पब्लिक फिगर असणाऱ्या  या खेळाडूंचे जीवन, भावनिक संघर्ष, मानवी मूल्ये आणि त्यांच्या जीवनात येणाऱ्या सर्व सामान्यांच्या प्रमाणे येणाऱ्या भावनिक आव्हानांचंही चित्रण केले आहे ', असे डॉ.देशमुख यांनी सांगितले.

खेळाडूंच्या जीवनातील भावनीक आव्हानांचा सविस्तर कॅनव्हास आपल्याला डॉ.देशमुख यांच्या  पुस्तकातून उलगडलेला आपल्याला पाहायला मिळतो, असेही मत प्रमुख पाहुण्या लता ग्वालानी यांनी व्यक्त केले.'डान्सिंग ऑन द व्हॉल्ट ऑफ डेथ' या पुस्तकाचे भाषांतर मूळ गोष्ट आणि आशय हरवू न देता प्रा. साळुंखे यांनी केला आहे, कारण मराठीचा इंग्रजी अनुवाद करताना बऱ्याचदा मूळ गोष्ट हरवण्याची शक्यता असते, मात्र, या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद अतिशय चपखल झालाअसल्याचे मत लता ग्वालानी यांनी व्यक्त केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी