मोहणपूर येथे श्री दत्तात्रय उत्सवानिमित्त जंगी कुस्त्यांची दंगल संपन्न -NNL


नांदेड, आनंदा बोकारे|
प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी श्री महंत 1008 रामभारती गुरु मारोती भारती यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी तिर्थक्षेत्र संस्थान मोहणपूर मौ.वाहेगाव ता.जि.नांदेड यांच्या वतीने दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार दि.9 रोजी दुपारी 2 च्या सुमारास कुस्त्यांच्या दंगलीला सुरुवात झाली. पहिली कुस्ती जिंकण्याचा मान पंढरपूर येथील पहेलवान तात्या जुमाळे यांनी पटकावला जुमाळे यांचा प्रतिस्पर्धी निळा येथील राजू पहेलवान यांना हार पत्करावी लागली. तर दुसरी कुस्ती देवठाना ता.पुसद येथील कु.पल्लवी श्यामराव पवार हिने मुलासोबतच्या कुस्तीत बाजी मारली.

नांदेड व परिसरातील मोठी यात्रा म्हणून मोहणपूरच्या दत्तात्रय उत्सवाची यात्रा असते.या यात्रेसाठी नांदेड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातीलही भाविक मोठ्या संख्येने दरवर्षी येत असतात. 30 नोव्हेंबरपासून 6 डिसेंबर 2022 पर्यंत भागवताचार्य श्री पुरुषोत्तम महाराज देशमुख झाडगावकर यांच्या भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांसाठी दररोज सकाळ-संध्याकाळ महाप्रसादाची सोय संस्थानच्या वतीने करण्यात आली होती. या ठिकाणी येणार्‍या भाविकांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होवू नये यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते. ही यात्रा दारुमुक्त व्हावी यासाठी स्वतः रामभारती गुरु मारोती भारती यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच यात्रेचे नियोजन करण्यात आले होते. 


9 डिसेंबर रोजी जंगी कुस्त्यांचा आखाडा पाहण्यासाठी हजारो यात्रेकरु दाखल झाले होते. कुस्त्यांचा आखाडा गाजविण्यासाठी देशभरातील विविध भागातील अनेक पहेलवानांनी या ठिकाणी हजेरी लावली होती. दुपारी 2 च्या सुमारास सुरु झालेल्या कुस्त्यांची दंगल रात्री 8 वाजता संपली. त्यात 11 हजाराची पहिली कुस्ती जिंकण्याचा मान पंढरपूर येथील पहेलवान तात्या जुमाळे यांनी मिळवला. त्यांचा प्रतिस्पर्धी निळा येथील राजू पहेलवान याला मात्र हार पत्करावी लागली. तर लक्षवेधी ठरलेली दुसरी कुस्ती देवठाना ता.पुसद येथील कु.पल्लवी श्यामराव पवार या 8 व्या वर्गातील मुलीने मुलासोबत खेळलेल्या कुस्तीत बाजी मारुन हम भी कुछ कम नही याचा प्रत्यय या कुस्तीमध्ये उपस्थितांना करुन दिला. दंगल चित्रपटातील मुलींनी ज्या प्रकारे देश-विदेशात कुस्तीचा आखाडा गाजवला.

अगदी त्याचप्रमाणे पुसद येथील या मुलीने आपल्यातील बळ दाखवून दिले. अत्यंत अटीतटीचा झालेला हा कुस्तीचा सामना पाहण्यासाठी कुस्ती पटूंनी गर्दी केली. यावेळी उपस्थितांनी या मुलीचे कौतुक केले. विजयी झालेल्या पल्लवीला द्वितीय पारितोषिक 7 हजार 1 रुपयांचे पारितोषीक देवून गौरविण्यात आले. कुस्तीचा सामना पाहण्यासाठी मजूर फेडरेशनचे अध्यक्ष लक्ष्मीकांत गोणे, नांदेडचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, लोह्याचे माजी सभापती सतीष पाटील उमरेकर, भुजंग पाटील, पोलीस निरिक्षक जाधव, कैलास पाटील, तुकाराम पवार, शंकरराव सोनटक्के, मारोती घोरपडे, आनंदा बोकारे, दिलीप कंधारे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी