हदगाव, शे.चांदपाशा| हदगाव तालुक्यात अनेक ठिकाणी रस्ते बांधकाम करण्यात येत आहे. या घाईगडबडीत माञ नागरिकांच्या जीवाचा किवा वाहन धारकांचा कोणत्याही प्रकारे विचार होत नाही. हदगाव शहरात काही दिवसापुर्वी उमरखेड टी पाईट ते न.पा सार्वजनिक वाचनालय पर्यत मुख्य प्रवेशरोडचे चारपदरीचे काम संथगतीने का होईना काही दिवसापुर्वी पुर्ण झाले असले तरी या चारपदरी रोडवर 'दुभाजक' नसल्याने माञ हदगाव शहराचा मुख्यप्रवेश रोड 'यमद्वार 'बनत आहे.
हदगाव शहराचा मुख्य प्रवेश रोड एकच असल्याने केवळ काही व्यापा-याच्या सागण्यावरुन ह्या रोडवर 'दुभाजक' कुणाच्या तरी बड्या राजकीय नेत्याकडे काही व्यापा-यानी हट्ट धरल्याने हे दुभाजक या चारपदरी रोडवर टाकण्यात आले नसल्याची चर्चा ऐकवायास मिळत आहे. हा मुख्यप्रवेश रस्ता राष्ट्रीय महामार्ग वाहतुकी करिता खुला झाल्याने अनेकदा अनेक वाहने एकाच वेळी काढण्याचा प्रयत्नात मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. कारण या रोडवर यापुर्वी अरुद रोड मुळे अनेक आपघात झालेले आहेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
हे इथल्या काही जबाबदार नेत्यांना माहीत असुनही इतक्या गंभीर प्रश्नावर माञ आपल्या सोयीच्या राजकाराणा करिता 'मौण 'पाळुन आहेत. या रोडवर 'दुभाजक असने फार गरजचे असतानाही या बाबतीत केवळ कंञाटदाराचे हित पाहण्यात येत असल्याच स्पष्ट जाणवत आहे. केवळ काही व्यापा-याच्य सांगण्यावरुन 'दुभाजक ' रोडवर बसविण्यात येत नसेल तर हे नागरिकाच्या जीवाशी आपल्या सोयीच्या राजकारणासाठी योग्य नव्हे. अश्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतुन व्यक्त होतांना दिसुन येत आहेत. या रोडवर प्रसिध्द शाळा महाविद्यालये असुन, हजारो मुले या रोडवर येणे जाणे करतात. विशेष म्हणजे हे शाळा महाविद्यालये या रोडच्या बाजुलाच आहेत. दिवसाकाठी शेकडो वाहने या रोडवर धावतात यामुळे वाहनाची वेग मर्यादावर नियंत्रण पण अवश्यक आहे. कारण यापूर्वी एका शाळकरी मुलाचा याच रोडवर अपघात झाल्याने मृत्यू झाला आहे. यामुळे 'दुभाजक' या रोडवर आसणे अगत्याचे झालेले आहे.