नांदेड। माजी मुख्यमंत्री अशोकराव, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. शिवसेनेचे विद्यमान जिल्हा संघटक तथा माजी तालुकाप्रमुख श्री विजय मुंडकर प्रश्न सीमा भागाचे...! सुरू असलेल्या चळवळी निमित्ताने पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, सामाजिक कार्यकर्ते तथा प्रमुख समन्वयक , ज्येष्ठ पत्रकार श्री गोविंद मुंडकर यांनी प्रारंभी २०१८ साली राजकारण नसलेली भूमिका मांडली. यास लोकांचा प्रतिसाद लक्षात घेता शिवसेना प्रमुख मा. उद्धव ठाकरे यांनी लक्ष दिले होते. शिवसेना ही ८० टक्के समाकारण आणि वीस टक्के राजकारण करते. संयुक्त महाराष्ट्राला अभिप्रेत असलेल्या सर्व बाबी डोळ्यापुढे ठेवून सामाजिक कार्यासाठी आम्ही या चळवळीत सहभागी होणार आहोत. मात्र सुरुवातीला भारतीय जनता पार्टीचे प्रतापराव पाटील चिखलीकर आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी.
संयुक्त महाराष्ट्र साठी आम्ही कायम आग्रही असून, सीमावर्ती भागतील लोकांचा समस्या सत्ताधारी यांनी जानुन घेऊन लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा लवकरच मा. उद्धव ठाकरे यांच्याकडे या चळवळीची सविस्तर माहिती देऊन शिवसेना पुढील दिशा ठरवेल व सीमावर्ती भागतील लोकांना शिवसेना वाऱ्यावर सोडनार नाही त्यांच्या सोबत आम्ही कायम राहू. असे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विद्यमान जिल्हा संघटक, तथा माजी बिलोली तालुकाप्रमुख श्री विजय मुंडकर यांनी स्पष्ट केले.