निवडणुकीसाठी लागणारी कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवकाला जोड्याने हाणले -NNL

हिमायतनगर शहरातील राष्ट्रीय महामागावरील मुख्य कमानीजवळ घडली घटना 


हिमायतनगर|
सध्या ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदासह सदस्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या एका ग्रामसेवकाला एका ग्रामपंचायत सदस्याने भरचौकात जोड्याने मारहाण केली आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे आज ही घटना घडली आहे. घटनेनंतर ग्रामसेवक संघटना पोलीस ठाण्यात पोचली असून, तक्रार देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने आज सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ऑफलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली होती. त्यासाठी होतकरू उमेदवारांची शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी धडपड सुरू होती. काहीही झाले तरी निवडणूक लढवायचीच असा चंग बांधलेल्या काही इच्छूक उमेदवारांच्या या धडपडीत काही ग्रामसेवक अडचणी निर्माण करत होते. काही जण नियमांवर बोट ठेवून तर काही ग्रामसेवक गावातील राजकारण्यांच्या हातचे बाहुले बनून आडकाठी घालत होते.


असाच एक प्रकार आज नांदेड जिह्यातील हिमायतनगरात घडला आहे. तालुक्यातील मौजे दरेगाव येथील एक इच्छूक उमेदवार ग्रामसेवकाकडे आवश्यक कागदपत्रांची मागणी करत होता. हा ग्रामसेवक त्याला ती कागदपत्रे काही देत नव्हता. त्यामुळ इच्छूक उमेदवाराचा पारा चढला. आणि त्याने या ग्रामसेवकाला हिमायतनगर येथील राह्स्त्री महामार्गावरील कमानीजवळ गाठले आणि भरचौकात त्या ग्रामसेवकाला जोड्याने हाणले. के.डी. सूर्यवंशी असे त्या ग्रामसेवकाचे नाव असल्याचे सांगण्यात येते. या घटनेमुळे ग्रामसेवक संघटना आक्रमक झाली असल्याचे पाहावयास मिळते आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी