दिव्यांगासाठी उत्कृष्ठ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशासनाला कडुन सन्मानीत
हदगाव। मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव, तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय आणि दिव्यांग विकास संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती कार्यालय येथे दिव्यांगासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिव्यांग विकास संघर्ष समिती व तालुका प्रशासना कडुन सन्मानपत्र देऊन जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्व प्रथम या कार्यक्रमाचे सुरुवात ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल यांच्या प्रतिमेचे पुजन प्रमुख पाहुणे जिवराज डापकर तहसिलदार, उमेश मुदखेडे गट विकास अधिकारी व डॉ.प्रदीप स्वामी वैद्यकीय अधिकारी आणि दिव्यांग विकास संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष समीर पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.
दिव्यांग योजनेसाठी विशेष परिश्रम करणाऱ्या सर्व तहसिल कार्यालय, पंचायत समिती, नगर परिषद आणि उप जिल्हा रुग्णालयात हदगांव, पत्रकार बंधु आणि दिव्यांग शाळेचे विशेष शिक्षक व तसेच दिव्यांगासाठी उत्कृष्ठ काम करणारी दिव्यांग विकास संघर्ष समिती व संघटनेत काम करणाऱ्या सर्व सामाजिक व्यक्ती आणि स्वयं सेवक यांना दिव्यांग विकास संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष समीर पटेल व तालुका प्रशासनाच्या वतीने सन्मान पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.व तसेच या कार्यक्रमात सुंदर सुत्रसंचलन सुनिल तोगरे यांनी केले.
त्यावेळी त्यांच्या सोबत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रंणजित लोखंडे, मोनाली रावते, मंडळ अधिकारी अरुण गिते, तलाठी जनार्दन मुंगल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख प्रल्हाद पाटील हडसणीकर, सुनिल पाटील हरडफकर, कुबेर राठोड, मनिषा सहस्त्रबुद्धे, सिमा काळे व दिव्यांग सहाय्यता कक्ष प्रमुख माधव आवळे, कामाजी सुर्यवंशी, गजानन मोरे, दिलीप बोरकर,अशोक चव्हाण, दिव्यांग शाळेचे प्राचार्य व सर्व शिक्षक आणि दिव्यांग व्यक्ती जमीर पटेल, चांदराव चव्हाण, राहुल सोनुले, निहाल पटेल, शेख नासेर, सचिन कहुळकर, सलमा शेख, बाबाअली, बिबी जहुरा मो. साबेर, नुर शहा, भिमराव कल्याणकर, फारुख कुरैशी आणि तहसिल कार्यालय,पंचायत समिती व उप जिल्हा रुग्णालयात आणि नगर परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी आणि पत्रकार बंधुसह अनेक मान्यवर यांनी जागतिक दिव्यांग दिनी उपस्थित राहुन जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा केला....
दिव्यांगासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करुन सन्मानपत्र देऊन सन्मानित म्हणजे त्यांना त्यांच्या केलेल्या कामाची पावती. समीर पटेल, दिव्यांग विकास संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष
दिव्यांग व्यक्तीने कोणत्याही परिस्थितीत जिवनात कधी ही खचून जाऊ नये. दिव्यांगावर मात करून दिव्यांगानी चांगले जिवन जगावे.,,,उमेश मुदखेडे, गट विकास अधिकारी, हदगांव
दिव्यांगासाठी असलेल्या विविध विभागातील सर्व दिव्यांग योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणार.,,जिवराज डापकर, तहसिलदार, हदगांव...