माहूर, राज ठाकूर। शहरातील गणेश टेकडी वरील मंदिर जवळ भारत दूरसंचार ऑफिस च्या बाजूला असलेल्या टिन पत्राच्या घराला दि.१५ डिसें. रोजी ३,३० वा, सुमारास अचानक आग लागली. आगीत अन्नधान्य, कपडे, महाविद्यालयीन पुस्तके, लॅपटॉपसह संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले.
घरात हिंदूस्तान पेट्रोलियम कंपनीच्या दोन गॅस सिलेंडरच्या टाक्या फुटल्याने मोठा स्फोट झाल्यामुळे शहरातील नागरिकांनी गणेश टेकडीकडे धाव घेऊन आग विझवली. घरात कुणीही नसल्यामुळे मोठाअनर्थ टळला. आगीत सुमारे दोन लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सुनिता बाळसकर त्यांची मुले आशिष,गौरव बाळसकर हे तिघेही मोलमजुरी करतात. विशेष म्हणजे आशीष बाळसकर हा यूपीएससी परीक्षेची तयारी करीत आहे त्याचे सर्व पुस्तके जळून खाक झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पो. नि. नामदेव रीठ्ठे, सपोनी संजय पवार सपोउनी. शरद घोडके, रामचंद्र दराडे, छगन राठोड, विजय आडे, प्रकाश देशमुख, सुशील राठोड, पवन राऊत व तलाठी भानुदास काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.