वैद्यकीय अधिकाऱ्याने जखमी युवकांची केली मदत -NNL


हदगाव, गजानन जिदेवार।
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मौजे करमोडी तालुका हदगाव येथील युवक विनोद दामोदर हा दिनांक १५ रोजी सकाळी १० वाजता बरडशेवाळा येथील बायपास वरील कवाना उडान पुलावर अपघातात गंभीर जखमी झाला होता. 


या रस्त्यावरून जात असलेले निमगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदेश कदम यांनी आपल्या स्वतःचे वाहन थांबून जखमीस उपचारासाठी आपल्या वाहनातून तातडीने नेले यावेळी प्रभाकर दहिभाते, जयवंत वाकोडे, सूर्यकांत सरोदे , दिनेश दहिभाते , यांची त्यांनी मदत घेतली बरड शेवाळा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर के. सी .बरगे यांनी येथे प्रथम उपचार केला त्यानंतर त्यांना नांदेड येथे पाठविण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदेश कदम व के.सी. बरगे यांनी वेळेवर उपचारासाठी दाखल केल्याने त्या जखमी युवकाचे  प्राण वाचले त्यामळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी