हदगाव, शे.चांदपाशा| हदगाव शहरातील व शासनाच्या गायरान जमीनीवर काहीनी अतिक्रमण केले असुन, दहा दिवसात हे आतिक्रमण न काढल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा हदगाव न.पा.चे मुख्याधिकारी डि.एन जाधव यांनी दिल आहे.
या बाबतीत अधिक माहीती देतांना मुख्याधिकारी यांनी सागितले की, जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येणार असुन, हदगाव शहराच्या काहीनी मोक्याच्या ठिकाणी शासकीय व गायरान जमीनीवर केले. ते आनधिकृत आतिक्रमण जवळपास 250 जणांनी केलेले अतिक्रमण असुन अदाजे शासनाच्या ३ हेक्टरवर अनेकांनी कब्जा केलेला आहे. शासकीय गायरान जमीनीवर प्रशासनाच्या वतीने कोणाचीही गय किंवा मुभा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अस ही नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांनी एका प्रश्नांच्या उत्तरात सागितले.
सदर नोटीस १९६६ कलम ५०(३)नुसार तसेच महाराष्ट् नगरपरिषदा व नगरपंचायती नुसार औद्योगिक नगरी अधिनियम द्वरे अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येणार आहे. आतिक्रमण काढण्यास आलेला खर्च महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम द्वरे वसुल करण्यात येणार आहे. हे आतिक्रमण धारकांना नोटीस देण्याचे काम न.पा.प्रशासना मार्फत युद्ध पातळीवर होत असुन, आतापर्यंत ८०%टक्के काम नोटीस वाटपाचे झालेले आहे अशी माहीती ही त्यांनी दिलेली आहे.