नांदेड| भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न,प.पु. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नांदेड येथील पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आज महापरिनिर्वाण दिनी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने त्यांना अभिवादन करण्यांत आले.
याप्रसंगी मराठी पत्रकार परिषदेचे माजी विभागीय सचिव प्रकाश कांबळे,नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणराव मा.भवरे,नरेश दंडवते,कृष्णा उमरीकर,त्रिरत्नकुमार भवरे,महानगर मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष रविंद्र संगनवार,राम तरटे,प्रशांत गवळे,सुरेश काशिदे,कमलाकर बिरादार पाटील,सुभाष काटकांबळे,सुरेश आंबटवार,आझम बेग,इम्रानखान पठाण,प्रदीप घुगे,जयवर्धन भोसीकर,किरण वाघमारे,धम्मानंद भद्रे आदींची उपस्थिती होते.