हिमायतनगर। तालुक्यातील मौजे सरसम (बु) येथे दिनांक सहा डिसेंबर २०२२ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे.
भारताचे भाग्यविधाते ,परमपूज्य बोधिसत्व, विश्वरत्न, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अतुलनीय असेच आहे. त्यांनी कोण्याही एका जाती धर्मासाठी कार्य केले नाही तर सर्वांसाठी केले. सर्वांना महान असे भारतीय संविधान देऊन आज प्रगतीच्या वाटेवर आणून सोडले आहे. अश्या या महामावास सरसम (बु) येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ज्ञानाच्या अथांग सागरास नमन केले.
यावेळी सरपंच प्रतिनिधी सखाराम ठाकूर, प्रकाश कांबळे, विकास कांबळे, चंद्रमणी वाठोरे,प्रवीण कांबळे, आकाश गुंडेकर, गंगाधर गोखले,पत्रकार संजय कवडे, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार विजय वाठोरे,नामदेव मोकासवाड,अविनाश गोखले, पौर्णिमा गोखले, बसवंता कांबळे, कालिंदाबाई वाठोरे, माजी सरपंच शेषेकला नगराळे, आम्रपाली नगराळे, आशाताई वाठोरे,भगवान तुळसे यांच्यासह बौद्ध बांधव, चिमुकले, महिलांवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात उपस्थित होते.