उस्माननगर, माणिक भिसे। माजलगाव जि.बीड येथील श्री.प्रभूप्रसाद माध्यम समुहाचे संस्थापक संपादक पत्रकार परमेश्वर लांडगे यांना वीरशैव समाजातील उत्कृष्ट असा समजला जाणारा "वीरशैव रत्न" पुरस्कार मिळाल्याबद्दल उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सभागृहात सत्कार करण्यात आला.
माजलगाव ( जि. बीड) येथील श्री प्रभु प्रसाद माध्यम समुहाचे संस्थापक संपादक असलेल्या पत्रकार परमेश्वर लांडगे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन यावर्षीच्या प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या वीरशैव रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबद्दल पत्रकार सभागृहात भेटीसाठी आलेल्या श्री. लांडगे यांचा पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बबन आप्पा खूर्पे, विलास आप्पा लांडगे यांची उपस्थिती होती. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे, उपाध्यक्ष माणिक भिसे, सचिव प्रदिप देशमुख, कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, देविदास डांगे यांची यावेळी उपस्थिती होती.
श्री. सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीने लांडगे यांचा गौरव
यावेळी पत्रकार परमेश्वर लांडगे यांचा गावातील सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव इसादकर, सचिव बसवेश्वर डांगे, बाबुराव शेकापूरे गुरूजी व समाज बांधवांनी वीरशैव रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्या बद्दल श्री. लांडगे यांचा शाल श्रीफळ, पुस्तक देवून गौरव केला.
पेठकर परिवाराकडून सत्कार
बहाद्दर पूरा (कंधार) येथील पेठकर परिवाराच्या वतीने वीरशैव रत्न पुरस्काराने सन्मानित परमेश्वर लांडगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बबन आप्पा खूर्पे, विलास आप्पा लांडगे, बसवेश्वर ( अनुप) भगवानराव पेठकर, शिवदास कुरुंदे, महादेव लष्करे, भुजंगराव ( बाबुराव) पेठकर आदींची उपस्थिती होती.