हिमायतनगर। तालुक्यातील खेळाडू वसीम खान 50 मीटर रायफल शूटिंगमध्ये 600 पैकी 597.6 गुण घेऊन रेनॉल्ट शूटर होण्याचं मान मिळविले आहे. जिद्द व अथक परिश्रमाच्या बळावर हे यश मिळविले आहे. या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. वसीम खान यांच्या यशाने नांदेड जिल्ह्यासह हिमायतनगर तालुक्यात आणखी एक माना नाचा तुरा रोवला गेला आहे.
20-11-2022 ते 09-12-202 या कालावधीत तिरुवंतपुरम केरळ येथे झालेल्या 65 राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत 50 मीटर प्रोन पुरुष वैयक्तिक स्पर्धेतून त्यांना हे यश मिळाला आहे त्यांच्या यशाबद्दल त्यांचे वडील जबी खान ,कोच अहेमद खान, विकी सिंग मेजर ,काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष फिरोज खान, शेख रफिक भाई, अमान तापरिया यांनी कौतुक केला आहे.